युवा सेना तालुकाप्रमुख शिवाजी पाटील गाढे यांनी केली निवेदनातुन मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर)
नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यात दि.16 मार्च 2023 रोजी अनेक ठिकाणी वादळी वारा, विजेच्या गडगडाटासह गारा व आवकाळी पाऊस पडून मोठ्याप्रमाणात नुकसानी झाल्या आहेत.
तसेच मुदखेड तालुक्यात हि आवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह गारा पडून या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी पिकांचे गहू,हरभरा,केळी,फळबाग,फुलबाग, टाळके ज्वारी, व अन्य पिंकाची मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांच्या नुकसानी झालेल्या आहेत.
त्यामुळे नुकसान झालेल्यांचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावे आसे निवेदन दि.16 मार्च 2023 रोजी मा.तहसीलदार मुदखेड यांना देवून निवेदनातुन मागणी केली आहे.
-------------------
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा