ज्वारी, भुईमूग, उन्हाळी सोयाबीन, फळभाज्यांचे प्रचंड नुकसान
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
कुंटूर परिसरातील अनेक गावांमध्ये दोन दिवसापासून पावसाची सुरुवात झाली मात्र आज चार वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात होऊन विजेच्या कडकटासह पाऊस व वारा वाहत आहे . त्यामुळे सर्वत्र पावसामुळे ज्वारी भुईमूग उन्हाळी सोयाबीन फळभाज्याची मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नागरिक परेशान आहेत. अवकाळी पावसामुळे विजेच्या कडकडासह पावसाला सुरुवात झाली आहे .रात्रीच्या वेळी दोन दिवसापासून पाऊस जोरदार सुरू आहे . आज कुंटूर मध्ये पाच वाजता पावसाला सुरुवात होऊन सुरुवात झाली वारा पाऊस असल्यामुळे जोरदार सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे .पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पिकाचे मोठे नुकसान झाले. विज पुरवठा बंद आहे. अवकाळी पावसाने कुटुर परिसरातील अनेक गावांना झोडपले आहे.
-------------------
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा