शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल का शेतकऱ्यांना उत्सुकता
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले कुंटूर गाव ओळखले जाते या कुंटूरला राजकीय दृष्ट्या फारच महत्त्व आहे इथून खासदार आमदार माजी मंत्री पर्यंत मजल मारणाऱ्या कुंटूर गावातूनच राजकीय घडामोडीला सुरुवात झाली. राजकीय घडामोडीचा चांगलाच घराणेशाहीचा धबधबा कुंटूर परिसरात राहिला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनीही मुदखेड मतदारसंघ मधून प्रचारासाठी कुंटूर पहिल्यांदा निवडले होते. त्याचबरोबर सध्याचे खासदार प्रतापराव चिखलीकर, खासदार गंगाधररावजी कुंटूरकर आमदार वसंत चव्हाण, आमदार राजेश पवार ,किती आमगार व मंत्री खासदार झाले मात्र कुंटूर परिसराचा विकासाला मात्र कोणीही लक्ष देत नसल्याची ओरड नागरिकांत होत आहे.
कुंटूर येथील पांदण रस्त्यांचा प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे गाव खेड्यामध्ये अनेक गावात पांदण रस्ते गावकऱ्यांनी व ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन बनवले आहेत. त्यामध्ये सातेगाव, ईकळीमाळ ,बळेगाव सुजलेगाव, अंतरगाव, विविध गावांमध्ये अंतर्गत पांदण रस्ते बनवून शेतकऱ्यांसाठी मार्ग तयार केले आहेत.
शेतीला येणे जाणे साठी चांगले रस्ते बनवले आहेत मात्र कुंटूर येथे पुढाकार कोणीच घेत नसून पांदण रस्त्याचा प्रश्न म्हटला की कोणीही पुढे तयार नसून ग्रामपंचायत ही दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्याच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यंदाही पांदन रस्ते होणार का नाही अशी चर्चा कुंटूर येथील चावडीवर रंगली आहे.
-------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा