महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणार - चेअरमन अभिजीत पाटील
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर ( प्रतिनिधी हुसेन मुलाणी )
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्रातील महिला भगिनींचा आवडीचा एकमेव सुप्रसिद्ध सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगावकर व समृद्धी मळेगावकर यांचा न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा उपक्रम दि.१९मार्च रोजी सायं६वा तनपूरे महाराज मठ पंढरपूर येथे उत्साहात झाला.
अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांनी विविध खेळ, मस्ती, मजा करत सगळ्या महिलांना खळखळून हसवत ठेवलं. जेष्ठ महिलांपासून अगदी लहानांपर्यंत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. महिला दिनानिमित्त महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आला त्याबद्दल विठ्ठल प्रतिष्ठानच्या सदस्यांचं आभार चेअरमन अभिजीत पाटील यांनी मानले.
माता-भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले. कधी ही घराबाहेर न पडणाऱ्या या महिलांच्या कार्यक्रमामुळे घराबाहेर पडल्या, मनसोक्त स्पर्धा खेळल्या, नाचल्या, हसल्या बागडल्या हा आनंद द्विगुणीत झाला. पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील महिलांसाठी येणाऱ्या काळात महिला सक्षमीकरण व महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहतील अशी ग्वाही अभिजीत पाटील यांनी दिली.
त्यानंतर चार तास रंगलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमातपहिला क्रमांक मिळवलेल्या सौ.स्वाती प्रतिश चव्हाण (फ्रिज)दुसरा क्रमांक सौ.सविता कृष्णा चव्हाण (LEDटी.व्ही)तिसरा क्रमांक सौ.जयश्री चंद्रकांत क्षीरसागर (कुलर)चौथा क्रमांक सौ.माधव नेताजी नगरे (सोन्याची नथ)पाचवा क्रमांक सौ.शितल आनंद चौगुले (मिक्सर) देत ५१ पैठणीसह सोन्याची नथदेऊन महिला स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी गोकुळजी मावरे तसेच सोयरीचे संस्थापक अध्यक्ष बी.पी.रोंगे सर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे, जयश्री धनंजय पाटील, सुमित्रा अभिजीत पाटील, श्रद्धाताई कदम (DYSP पत्नी), उपनगराध्यक्ष श्वेताताई डोंबे, राष्ट्रवादी नेत्या अनिता पवार, रश्मी अमर पाटील, माधुरी दिलीप धोत्रे, समाजसेविका शुभांगी भोईटे, दुर्गाताई माने, पूजा अंभगराव, डॉ.संगीता सुरवसे, चारुशीला कुलकर्णी यासह असंख्य महिला भगिनीनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
-------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा