बरबडा वजीरगाव शिवारातून माती व रेती वाहतूक जोमात
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील बरबडा सर्कल अंतर्गत येणाऱ्या वजीरगाव टाकळी गावामध्ये गेल्या चार दिवसापासून अवैध रेती वाहतूक व मातीची दिवसाढवळ्या चोरी होत आहे . 262 ब्रास चा परवाना असून चार दिवसापासून हजारो ब्रास माती उत्खनन केले जात आहे. सात हायवा दोन जेसीबी मशीन चया साह्याने रात्रंदिवस माती, मुरूम, आणि वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरु आहे.
मातीही वजीरगाव टाकळीहून वाजेगाव येथे नेत आहेत बिनधास्तपणे अवैध धंदेवाले रात्रंदिवस रेती व मातीची चोरी करत असताना शासकीय कर्मचारी संपावर गेल्याचा फायदा अवैध धंदेवाले घेत आहेत त्यामुळे अवैध गुत्तेदारांचे चांगभलं होत असताना शासकीय महसूल मात्र बुडत असून तहसीलदार व तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक सर्व संपावर गेल्याने त्याचा चांगलाच फायदा अवैध धंद्ये वाल्यांना होत आहे.
त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे चे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सदर परिसराची पाहणी करून अवैध माती उत्खनन केल्याची तपासणी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यातून होत आहे.
-------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा