श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान यांनी केले आयोजन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान यांनी जागतिक महिला दिनानिमित्त न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमात पंढरपूर परिसरातील जास्तीत जास्त महिला भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेने विठ्ठल प्रतिष्ठान यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 19 मार्च रोजी श्री संत तनपुरे महाराज मठ येथे सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेला आणि महिला भगिनींचा आवडता असलेला न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सुप्रसिद्ध सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर आणि बाल गायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनातून गृहिणींना माता भगिनींना काही आनंदाचे क्षण मिळावे यासाठी या कार्यक्रमात काही मजेदार बुद्धिवर्धक व आकर्षक खेळ , प्रश्नमंजुषा, उखाणे असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे त्याचबरोबर प्रथम पाच विजयी महिलांना आकर्षक असे बक्षीसही देण्यात येणार आहेत ज्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी फ्रीज आणि पैठणी साडी द्वितीय क्रमांकासाठी एलईडी टीव्ही आणि पैठणी साडी तृतीय क्रमांकासाठी कुलर आणि पैठणी साडी चतुर्थ क्रमांकासाठी सोन्याची नथ आणि पैठणी साडी आणि पाचव्या क्रमांकासाठी मिक्सर आणि पैठणी साडी अशी बक्षिसे असणार आहेत.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता श्री संत तनपुरे महाराज मठ स्टेशन रोड पंढरपूर या ठिकाणी हा कार्यक्रम होणार असून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून श्री विठ्ठल प्रतिष्ठान पंढरपूर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 9595020020 आणि 9860893089 या दोन क्रमांकावर माता भगिनींनी संपर्क करावा तसेच पंढरपूर शहर व परिसरातून जास्तीत जास्त महिला माता भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने विठ्ठल प्रतिष्ठान पंढरपूर यांनी केले आहे
-----------------------------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा