दारू सोडवण्याच्या बहाण्याने गोळा केली आहे करोडोंची माया
शिवशाही वृत्तसेवा, बीड (प्रतिनिधी सुनील धिमधिमे)
बीड जिल्ह्यातील बोगस व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका सौ. अंजली पाटील मुंबईत असलेचा फोटो व्हायरल होत आहे. बीड जिल्ह्यात वाघाळा, मोरेवाडी, अंबाजोगाई येथे बोगस व्यसनमुक्ती केंद्र चालवून, दारू व इतर व्यसनातुन मुक्ती मिळेल अशी अफवा पसरवून गोरगरिबातील व्यसनाधीन लोकांकडून हजारो रुपयांची लूट करणाऱ्या सौ अंजली पाटील व त्यांचे पती राजकुमार गवळे या पती-पत्नीने बीड जिल्ह्यामध्ये व्यसनमुक्ती आधार केंद्र नावाने वाघाळा, अंबाजोगाई, ,मोरेवाडी , इत्यादी ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले होते. बीड जिल्ह्यात व्यसन मुक्ती केंद्राचा कोणताही रितसर परवानगी न घेता व्यसनमुक्ती केंद्र चालवून खोटी जाहीरात करुन जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील दारू चे व्यसन लागलेल्या भोळ्या भाबड्या लोकांकडून लाखो रूपयांची माया या दांपत्याने जमा केली आहे.
अंबाजोगाई येथील वंचित बहुजन आघाडी कडे वाघाळा येथील केंद्रातील कर्मचारी डाँ. वाघमारे यांनी सर्व हकीकत कथन करून व्यसन मुक्ती केंद्रातील अनागोंदी कारभाराचा भांडाफोड केला आहे. व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका सौ. अंजली पाटील व श्री. राजकुमार गवळे यांच्या वर अंबाजोगाई येथील ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तेव्हापासून हे दाम्पत्य फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान अंजली पाटील हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो फोटो मुंबई येथील असल्याची संपूर्ण बीड जिल्ह्यात चर्चा आहे.
-------------------
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा