शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
मुखेड तालुक्यातील लादगा येथीलम हिला शेतकरी सौ.भारतबाई अंतेश्वर जाधव व त्यांचे पती अंतेश्वर जाधव हे दि.16 मार्च रोजी त्यांच्या शेतातील गव्हाच्या पिकाची कापणी करण्यासाठी तिन महिला शेतमजुर घेऊन शेतात गेल्या होत्या.व त्यांच्या कडे दोन शेळ्या होत्या त्या चारविण्यासाठी सोबतच शेतात आनुन त्यांना जवळच शेताच्या धुरयाला चरण्यासाठी सोडुन त्या महिला शेतकरी व त्यांचे पती व सोबतच्या तिन महिला शेतमजुर गहू पिकाची कापणी करीत होते.
दुपारी अचानक अंदाजे दोन वाजता च्या दरम्यान अचानक पणे आभाळ येऊन विजेचा गडगडाट करीत पावसाचे थेंब पडत असताना त्यांच्या सोबतचे तिन महिला शेतमजुर व स्वत महिला शेतकरी,व त्यांचे पती गव्हाच्या पिकाची कापणी करीत होते,व जवळच थोड्या अंतरावर त्या महिला शेतकऱ्याच्या दोन शेळ्या चरत होत्या तेव्हा अचानक पणे चरत असलेल्या एका शेळी च्या अंगावर विज पडली त्या मुळे त्या शेळीचा जागीच मृत्यु झाला.
तसेच तेथुन थोड्याच अंतरावर त्याच शेतात काम करीत आसलेल्या महिला शेतकरी सौ.भारतबाई अंतेश्वर जाधव,त्यांचे पती अंतेश्वर जाधव व सोबतच्या महिला शेतमजूर सुदैवाने बालबाल वाचल्या.या घटनेची माहिती मिळताच गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय शेषेराव पाटील लादगेकर हे घटना स्थळी जाऊन सदरील घटनेची माहिती घेऊन विचार पुस करून शेतकऱ्यास झालेल्या नुकसानी बदल धिर देऊन सदरील शेतकऱ्यास शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी या घटनेची माहिती मुखेड तहसील कार्यालयातील लादगा या गावासाठी महसुल विभागाचे असलेले तलाठी यांना भ्रमणध्वनी वरून माहिती दिली असल्याची माहीती देण्यात आली आसल्याचे बोलल्या जात आहे.
त्या मुळे त्या ठिकाणी गावातील बरीच लोक जमलेले होते. तसेच या गरीब महिला शेतकऱ्याचे या झालेल्या अवकाळी पावसात विज पडून शेळी मरण पावल्या मुळे नुकसान झालेले आहे.त्यामुळे या महिला शेतकऱ्यास शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी गावातील नागरीकांचे म्हणने आसल्यांचे दिसून येत आहे.
-------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा