हातातोंडाशी आलेले पीक भूईसपाट शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुरकर)
सध्या नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात ढगाळ व मध्यम वातावरण असल्यामुळे नांदेड शहरापासून जवळच असलेल्या वडगाव परिसरात सायंकाळी ४ वाजता अवकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे यात गहू हरभरा ज्वारी फळबागांसह इत्यादी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकऱ्याच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी शेतकरी वर्गातून मागणी केली जात आहे त्यासाठी महसूल विभागाने अवकाळी पाऊस व गारांचा पाऊस झाल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी तहसीलदार व मंडळ अधिकारी व तलाठी यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देऊन अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे वडगाव येथील शेतकरी बालाजी पुयेड या शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केली आहे.
-------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा