भाविक भक्तांनी कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
कै.डी.बी. पाटील होटाळकर यांच्या जयंतीनिमित्त गजर कीर्तनाचा जागर हरीनामाचा या कार्यक्रमा अंतर्गत दि.१९ मार्च रोजी महाराष्ट्रातील ख्यात नाम कीर्तनकार भागवताचार्य ह.भ.प.श्री महंत समाधान महाराज भोजेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम स्व.डी.बी.पाटील स्मृती स्थळ नायगाव बा.रात्री ७ ते ९ वा आयोजित करण्यात आका आहे.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील होटाळा येथील शेतकरी व उद्योगपती घराण्यातील व्यक्तिमत्व कै.डी.बी. पाटील होटाळकर यांच्या जयंतीनिमित्त गजर कीर्तनाचा जागर हरीनामाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.मि.फा. कृ द्वादशी दि. 19 मार्च 2023 रोजी जयंतीनिमित्त रात्री 7 ते 9 वाजता कीर्तन सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा भागवताचार्य ह.भ.प. महंत श्री समाधान महाराज भोजेकर (जळगाव) उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास श्री 108 महंत येदुबन महाराज कोलंबीकर ,सद्गुरू मूर्ती चंद्रशेखर महाराज देगलूरकर,गुरुबाबा औसेकर ,व पंढरपूर विठल रुक्मिणी मंदिर समिती कार्याध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,गोरक्षनाथ महाराज औसेकर यांचे आशीर्वाद राहणार आहेत.
समाधान महाराज भोजेकर यांचा हरी किर्तन सोहळा रात्री ७ वाजता स्व.डि.बी.पाटील स्मृतिस्थळ मिलिनीयम इंग्लिश स्कुल नायगाव बा.येथे भव्य पटांगणावर होणार आहे.या मध्ये प्रसिद्ध गायकवृंद,मृदंगवादक,नायगाव पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांची हजरी राहणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्तराम भगवानराव पाटील पवार होटाळकर व शिवराज भाऊराव पाटील होटाळकर (माजी शिक्षण सभापती नांदेड) व स्व.डी.बी.पाटील जयंती सोहळा समिती यांनी केले आहे.
-------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा