नवनिर्वाचित संचालक मंडळाचा आडसकर यांच्याकडून सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, बीड (जिल्हा प्रतिनिधी सुनील धिमधिमे)
भा.ज.पा. चे जेष्ठ नेते श्री. रमेवराव आडसकर यांच्या नेतृत्वाखालील पतसंस्था बचाव पॅनल ने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले असून बीड जिल्ह्यातील केज येथील शिक्षक पतसंस्थेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे
बीड जिल्ह्यातील केज येथील शिक्षक पतसंस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रमेश राव आडसकर यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक पतसंस्था बचाव पॅनल ने चांगलाच जोर लावला होता शिक्षक सभासदांनी पतसंस्था बचाव पॅनलवर विश्वास दाखवत भरघोस मतांनी हे त्याने विजयी केले आहे. पॅनलच्या या विजयामुळे पॅनल प्रमुख रमेश आडसकर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे तसेच
शिक्षक पतसंस्था बचाव पॅनल चे विजयी संचालक श्री. कल्याणराव काळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर सचीव पदी श्री. संजय गंलाडे यांची निवड करण्यात आली आहे. दि. 28/2/ 2023 रोजी पार पडलेल्या निवडणूक मधे निवडणूक निर्णय अधिकारी म्हनुन श्री. मोटे यांनी काम पाहिले.
अध्यक्ष निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष , सचिव संचालक मंडळाचा रमेशराव आडसकर यांनी सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा