maharashtra day, workers day, shivshahi news,

तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा जिल्हा रायगड यांच्या वतीने पंढरीत महास्वच्छता अभियान

महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी निमित्त आयोजित उपक्रमांमध्ये १७०० श्री सदस्यांचा सहभाग
nanasaheb dharmadhikari pratishtha, shri baithak, pandharpur, maharashtra, shivshahi news,
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर 
तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा जिल्हा रायगड आयोजित महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी निमित्त महास्वच्छता अभियान महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर मंगळवेढा सांगोला अकलूज करमाळा या शहरात श्रीसदस्यांनी स्वच्छता केली
 आज पंढरपूर येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने महास्वच्छता अभियान संपन्न झाले यावेळी पंढरपूर तालुक्यातील १७०० श्री सदस्यांनी च्या माध्यमातून ९०टनाच्या पुढे कचरा गोळा करून कचरा डेपो मध्ये पाठवण्यात आला यासाठी नगरपरिषद पंढरपूर कडून घंटागाडी २०, २ टिप्पर, २ कंटेनर, २ जेसीबी तसेच श्री सदस्यांकडून २२ ट्रॅक्टर, ३ छोटा हत्ती यांच्या माध्यमातून सर्व कचरा गोळा केला गेला यासाठी नगरपरिषद पंढरपूरचे मुख्याधिकारी श्रीअरविंद माळी साहेब आरोग्य अधिकारी श्री शरद वाघमारे साहेब आरोग्य अधिकारी श्री नागनाथ तोडकर साहेब यांचे विशेष सहकार्य मिळाले तसेच पंढरपूर विभागाचे उपाधीक्षक श्री विक्रम कदम साहेब, शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षकश्री अरुण फुगे साहेब यांनीही सहकार्य केले. यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी म्हणाले की आजचे कार्य बघून आम्ही सर्व भारावून गेलो आहोत. आज तुम्ही आमचा सत्कार करण्यापेक्षा आम्ही सर्वांनी तुम्हा सर्व श्रीसदस्यांचा सत्कार करणार आणि त्यांनी सन्मानपत्र देऊन सत्कार केला. यावेळी श्री विक्रमजी कदम साहेब यांनी अंतर्मनाची स्वच्छता ही श्रवणातून केली जाते असे मत व्यक्त करून मार्गदर्शन केले. स्वच्छता मोहीम पूर्ण करून शहर स्वच्छ झाल्याची भावना सर्व प्रशासन व नागरिकांतून व्यक्त होत आहे आजची स्वच्छता मोहिम प्रतिष्ठानचे १७०० सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने करतात याचे मान्यवरांनी कौतुक केले आहे
श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सामाजीक बांधिलकीची जाणीव ठेवून सतत स्वचच्छता अभियान,वृक्षरोपण आणी संवर्धन, रक्तदान शिबीरे,शैक्षणीक साहित्य वाटप, आरोग्य शिबीरे, धरणातील गाळ काढणे आदी ऊपक्रम राबविले जातात याचीही आठवण उपस्थित पाहूण्यनी करुन दिली.
----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !