चेअरमन पदी व्यंकटराव पा.पवळे यांची निवड
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या जनसंपर्क कार्यालय उमरी येथे कवळे गुरुजी यांच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन आणि संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित चेअरमन पदी श्री व्यंकटराव शंकरराव पा.पवळे यांची निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन पदी श्री दत्तराम मुंडकर निवड करण्यात आली.
सदर निवड संपन्न झाल्यानंतर मारोतराव पाटील कवळे यांनी विविध कामा विषयी माहिती देऊन पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री प्रल्हाद पाटील इज्जतगावकर,श्री प्रभाकर पाटील पुयेड, श्री बालासाहेब पाटील हातनीकर,प्रकाश पाटील चिंचाळकर,लिंगराम पाटील कवळे, बापूसाहेब पाटील कौडगावकर,आत्ममामा चव्हाण,मोहणराव पाटील पवळे,पंजाबराव पाटील पवळे,बाबू पाटील पवळे,संतोष पाटील पवळे,रमेश पाटील पवळे,अविनाश पाटील पवळे,शंकर पाटील पवळे,दिलीप पाटील पवळे, ढोलउमरी चे सरपंच श्री संतोष पाटील सरसे, यावेळी सर्व सदस्य आणि गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा