दि.08 एप्रिल 2023 रोजी ह.भ.प.नामदेव महाराज दापकेकर यांचे काल्याचे कीर्तन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
मुखेड तालुक्यातील मंग्याळ येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त अंखड हरीनाम सप्ताह व लक्ष्मण शक्तीचा भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे,
ह.भ.प.नामदेव महाराज दापकेकर, ह.भ.प.नराशाम महाराज येवतीकर,ह.भ.प.नामदेव महाराज उमरजकर यांच्या कृपा आशीर्वादाने श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त दि.01/04/2023 शनिवार रोजी प्रारंभ व दि.08/04/2023 शनिवार रोजी सकाळी 11 ते 1 वाजता ह.भ.प.नामदेव महाराज दापकेकर यांचे काल्याचे कीर्तन होईल व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी सर्व भाविक भक्ततांनी या कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा.
लक्ष्मण शक्ती वाचनाचा कार्यक्रम दि.05/04/2023 वेळ सायंकाळी 6 वाजता.श्री हनुमान जन्मोत्सव महाप्रसाद दि.06/04/2023
कार्यक्रमाची रूपरेषा
सकाळी 11 ते 1 वाजता गाता भजन,सायंकाळी 6 ते 8 हरिपाठ, रात्री 9 ते 11 हरिकिर्तन,रात्री 1 ते 4 हरिजागर,पहाटे 6 ते 4 काकडा आरती.
शनिवार.01/04/2023 रोजी ह.भ.प.भानुदास महाराज वांजरवाडा यांचे किर्तन,
रविवार.02/04/2023 रोजी ह.भ.प. व्यंकट महाराज आवळगावकर यांचे किर्तन,
सोमवार दि.03/04/2023 रोजी ह.भ.प.अनिल महाराज दापकेकर यांचे किर्तन,
मंगळवार दि.04/04/2023 रोजी ह.भ.प. हानमंत महाराज अंबुलगेकर यांचे किर्तन,
बुधवार दि.05/04/2023 रोजी ह.भ.प. उत्तम गरूजी वनाळे यांचे दुपारी 1 ते 3 किर्तन,
गुरूवार दि. 06/04/2023 रोजी ह.भ.प. व्यंकट महाराज हाळणीकर यांचे किर्तन,
शुक्रवार दि. 07/04/2023 रोजी ह.भ.प. मारोती महाराज यलमटवार यांचे किर्तन,
शनिवार दि . 08/04/2023 रोजी ह.भ.प.नामदेव महाराज दापकेकर यांचे काल्याचे कीर्तन 11 ते 1 वाजता होनार आहे.
भजनी मंडळ : सावरगाव, कामजळगा, कुंदराळ, सावरगाववाडी, पैसमाळ, राजा दापका, हिपरगा, होंडाळा, गडगयाळवाडी, आखरगा, जुन्ना, शिकारा, सांगवी, लादगा, मुखेड
गायक : विष्णु महाराज शिकारा, मन्मथ महाराज खटके सावरगाव, पांडूरंग महाराज गुटे सावरगाववाडी, बळी पाटील होंडाळा, बालाजी पाटील आखरगा, विभुते महाराज होंडाळा, गणेश महाराज जुन्ना, कोंडीबा महाराज मंग्याळ, नामदेव महाराज आखरगा,
मृदंगाचार्य : बसवराज स्वामी कामजळगा,व्यंकटराव पाटील मंग्याळ, महावीर महाराज कामजळगा,जुबरे पैसमाळ,
आरती प्रमुख : माधवराव वनाळे,आनंदराव वनाळे,
विणेकरी प्रमुख : भिमराव श्रीरामे,भास्कर सादगिर,
हरिपाठ प्रमुख :ह.भ.प.कोंडिबा महाराज, ह.भ.प.शिवाजी महाराज.
काकडा प्रमुख : हनुमंत मंडीले, शामराव यलेवाड, रामराव पाटील, तुकाराम पाटील, गंगाधर पाटील,
महाप्रसाद दिनांक 08 एप्रिल 2023 रोज शनिवारी काल्याच्या किर्तना नंतर होईल विनीत समस्त गावकरी मंडळ मंग्याळ ता.मुखेड
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा