नायगाव नगरपंचायत कार्यालयाने पुर्व सुचना न देता विज मंडळाच्या कार्यालयास ठोकले सील
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव बाजार नगरपंचायत चा अजबच कारभार नायगाव तालुक्यासह सर्व जनतेने पहावयास व त्रासाला समोरे जावे लागत आहेत हे अतिशय खेदाची बाब आहे नायगाव बाजार शहरातील पाणी पुरवठा व दिवाबत्ती ची थकबाकी दोन कोटी 80 लाख थकीत असताना नायगाव नगरपंचायतने अकलेचे तारे तोडत वीज मंडळाच्या कार्यालयाच्या किरायाचे येणे बाकी असल्यामुळे नगरपंचायतने जाणीवपूर्वक तसेच पूर्व लेखी सूचना न देता विज मंडळाच्या कार्यालयास सील ठोकले आहे त्यामुळे नायगाव बाजार शहर अंधारात बुडाले त्यामुळे चोऱ्या होण्याचे नाकारता येत नाही
नायगाव बा. शहरातील भर उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईच्या तसेच मुस्लिम बांधवांच्या पवित्र महिन्यामध्ये अर्थात रमजान महिना चालू असून त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
उलटा चोर कोतवाल को दाटे
या म्हणी प्रमाणे असेच नायगाव बा. शहरांमध्ये अलबेल राजकारण चालू आहे नायगाव बाजार शहरातील विज महावितरण कार्यालय आज रोजी नरसी येथे स्थलांतर झाले आहे यास कोण जबाबदार नायगाव शहरासह तालुक्यातील लोकांना वीज भरण्यास व ईतर कामासाठी जनतेच्या विविध अडी अडचणीला कोण जबाबदार म्हणून या विषयास जो कोणी जबाबदार असेल त्यांच्यावरती कारवाई होणे अत्यंत गरजेचे असल्याचे जनतेच्या चर्चेतून ऐकावयास मिळत आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा