कामाचा दर्जा अतिशय खराब असल्याचा आरोप
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
मुदखेड तालुक्यातील मौजे महाटी ते चिलपिपरी पर्यंत एक किलोमीटरचे डांबरीकरण व मजबुतीकरण रस्ता बँका कन्ट्रक्शन मार्फत चालू असून ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व बोगस होत असल्याने मुदखेड युवा सेना तालुकाप्रमुख शिवाजी पाटील गाडे यांच्या पुढाकाराने युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले आहे
वृत्त असे की, महाटी ते चिलपिपरी हा एक किलोमीटर चा रस्ता बँका कंट्रक्शन मार्फत चालू असून त्या एकंदरीत रस्त्याची रुंदीकरण सात साडेसात मीटरचा असतानाही फक्त चार मीटर रस्ता होत आहे व सदर रस्त्यावर मुरूम टाकण्याऐवजी मातीच टाकून फक्त दबई करून त्यावर पाणी न टाकता व मजबुतीकरण न करता बोगसपणाने काम केले जात आहे ही गोष्ट युवा सेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कामावर जाऊन रस्त्याची रुंदीकरण सात ते साडेसात मीटर असताना फक्त चार मीटरच रस्ता का केला जात आहे .
असा प्रश्न करीत आणि मुरूम टाकण्याऐवजी व पाणी टाकून मजबुतीकरण करण्याऐवजी आपण थातूरमातूर पद्धतीने हे काम बोगसपणाने केल्या जात असल्याने तो काम बंद करण्यात यावे म्हणून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पाटील गाडे युवा सेना मुदखेड तालुकाप्रमुख यांच्या पुढाकाराने माधव पाटील गाडे, तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश पाटील, संभाजी गाडे, व्यंकटी गाडे सरपंच, बाळू कोलते, सदानंद गाडे, माऊली गाडे, गुलाब गाडे, हनुमंत गाडे, विठ्ठल गाडे, हनुमंत गाडे, व्यंकटी गाडे दिगंबर, बालाजी गाडे, माधव शेट्टी, दत्ता कोलते यांनी बोगस होत असलेले सदर काम बंद पडले आहेत.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा