जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय अंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेची जनजागृती
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय अंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेची जनजागृती कार्यक्रम नायगाव तालुक्यातील नायगाव नरसी मांजरम व कुंटूर या गावात नटराज सांस्कृतिक कलापथक सुजलेगाव येथील शाहीर बळीराम जाधव व त्यांच्या संचांनी कलापथकाद्वारे विविध योजनेची गीत गायनाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाने रमाई आवास घरकुल योजना गटाई कामगारांना पत्रे, छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती,कै. वसंतराव नाईक वस्ती तांडा, मागासवर्गीय विद्यार्थी,विद्यार्थिनींना भारत सरकार शिष्यवृत्ती अशा विविध लोककल्याणकारी योजनेची माहिती कलापथकाद्वारे जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय अंतर्गत विविध योजनेची माहिती तालुक्यातील नायगाव नरसी मांजरम व कुंटूर येथे नटराज सांस्कृतिक कलापथक सुजलेगाव येथील शाहीर बळीराम जाधव व त्यांच्या संचातील शाहीर माधव बैलकवाड,माधव पवार, पूजा आईलवार, गंगाधर कोंचमवाड, दत्ता रहाटे, नागोराव डोणगावकर, नालंदा सांगवीकर, गौतम सांगवीकर, राजेश शिंदे यांनी जनजागृती केल्यामुळे सदर गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा