ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
प्रक्षोभक विधान करुन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या तेलंगाणातील वादग्रस्त राऊडी शिटर आ.टी.राजासिंग यास नांदेड जिल्हाबंदी करण्यात यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे नायगावच्या तहसीलदारामार्फत मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ शाखा नायगावच्या वतीने करण्यात आले आहे
सविस्तर वृत्त असे की सद्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु असून दि.१४ एप्रिल रोजी भारतीय संविधानाचे निर्माते, महामानव,विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा होत असतो परंतु नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला बिघडविण्यासाठी जिल्ह्यातील बिलोली व मुदखेड येथे विविध प्रकरणी अनेक गुन्हे असलेले तेलंगाणातील वादग्रस्त राऊडी शिटर आ.टी.राजासिंग याची सभा व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे संंबंधित वादग्रस्त आ.टी.राजासिंग याच्या विरोधात तेलंगाणात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत ज्यात धार्मिक तेढ निर्माण करने, धार्मिक दंगलीसाठी प्रक्षोभक विधान केल्याप्रकरणी राऊडी शिटर म्हणून घोषित करण्यात आले आहे
सन २०२३ साली महाराष्ट्रातील लातूर, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यातील हिंदू जन आक्रोश मोर्चात आ.टी.राजासिंग याने धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केल्याप्रकरणी उपरोक्त जिल्ह्यातील पोलिसांनी त्याच्याविरोधात लातुर येथे दि.२७ फेब्रुवारी २०२३ रोजी भादवी १५३-अ, १५३ -ब, २९५ अ, ५०५, अहमदनगर जिल्ह्यात दि. १० मार्च २०२३ रोजी भादवी २९५-अ, ५०४ व ५०६, औरंगाबाद जिल्ह्यात दि. १९ मार्च २०२३ रोजी भादवी १५३, १५३-अ, ५०५, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे यामुळे वादग्रस्त वक्तव्य करुन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीची आपल्या जिल्ह्यातील बिलोली व मुदखेड येथे सभा व रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे.
सभेच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण होऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता आहे यामुळे नांदेड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आ.टी. राजासिंग यांना जिल्हाबंदी करावी अशी मागणी ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ शाखा नायगावच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहे सदर निवेदनावर शेख आरीफ (जिल्हा कोषाध्यक्ष तन्जीम ए इन्साफ),सद्दाम पटेल (जिल्हा सहसचिव तन्जीम ए इन्साफ),शेख अजिम नरसीकर(सामाजिक कार्यकर्ते),सय्यद अजिम नरसीकर,साजीद बागवान,बेग इरफान नरसीकर(टिपू ग्रुप नरसी), रफिक पठाण नरसी,अझहर शेख नरसी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा