कुंटूर येथे गेल्या काही महिन्यापासून जलवाहिनी टाकण्याचे काम
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
कुंटुर येथील ग्रामपंचायत च्या अंतर्गत जल वाहिनीचे काम जोरात सुरू आहे. कुंटूर येथे तीन कोटी रुपयांच्या वर आठ इंची पाईपलाईनचे काम व एक जल कुंभ पाण्याची टाकी बांधकाम सुरू करण्याचा शुभारंभ गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते झाला गावातील नागरिकाला रस्त्याने चालणे देखील घड होत नाही त्याच रस्त्याला फोडून पाईपलाईन टाकून माती व उरलेले साहित्य रस्त्यावरच टाकून रस्ते मात्र खडखडीत अबडधोबड खड्ड्याचे बनवल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कुंटूर येथे गेल्या काही महिन्यापासून जलवाहिनी टाकण्याचे काम गुत्तेगार मार्फत सुरू असून या कामाचे आठ इंची पाईप टाकून टाकीपर्यंत सदर दीडशे ते दोनशे वर्षाची जुनी टाकी तोडून नवीन टाकी उभारण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक यांनी दिली.
मात्र नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असून रस्त्यातून खोदकाम करून पाईपलाईनचे कामे करून रस्त्यावरच मातीचे ठिकाणी टाकल्याने चालकासह नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर मातीचे खडे गिट्टीचे दगड पडल्याने चालणे देखील कठीण होत आहे . मात्र याकडे ग्रामपंचायतला काहीच घेणे देणे नसल्याचे दिसून येत आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा