संशयित महिलां चोरांना कुंटुर पोलिसांनी पकडून तहसील कार्यालयात केले हजर
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नांदेड हैद्राबाद महामार्गांवर सध्या महिला चोरांचा सुळसुळाट झाला असून छोथ्या मोठ्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. नायगाव तालुक्यातील कुंटुर पोलीस स्टेशन अंतर्गत कृष्णुर येथे गर्दीच्या ठिकाणी चोरी करण्याच्या उदेशाने बस मध्ये चढायच्या तयारीत असलेल्या महिलांना जागरूक नागरिकांनी पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिले.
कुंटूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आमु शंकर मसनजोगी (वय 35), अलबेली सिननु मसनजोगी (31), संगीता राजु मसनजोगी (33), शालीनी राजु मसनजोगी (36), अंजली राजु मसनजोगी, श्रीरीक्षा चिरंजीवी मसनजोगु या सहा संशयित चोर महिलांची चौकशी करून नायगाव तहसीलदार याचा समोर उभे केले. तहसीलदार यांच्या कार्यालयामार्फत महिलांना पावबंद करून त्यांच्या अंगठ्याचे ठसे घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. व त्यांना पुढील सुनावणीची तारीख देण्यात आली मात्र ते पुढील तारखेस हजर राहतात का नाही
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत मागच्या काही दिवसांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अशाच प्रकारे महिला चोरी करत असल्याचे उघडे झाले होते. कहाळा व बरबडा येथे ही चोरीची घटना झाली होती. कहाळा येथील नागरिक कंदुरीच्या कार्यक्रमात गेले असता त्यांच्या घरावर काही महिला चोरट्याने डल्ला मारून 90 हजाराचं साहित्य चोरीचा प्रकार उघड झाला होता. तसेच बरबडा येथेही चोरीचा प्रकार झाला होता. त्याच अनुषंगाने कुंटूर पोलिसांनी 26 मार्च रोजी नांदेडहून नायगाव कडे जाणाऱ्या एसटी बस मध्ये महिला चोरट्या गाडीमध्ये लेकरासहित गाडीमध्ये घुसून महिला व पुरुषांची पाकीट मारण्याच्या उद्देशाने व चोरी करण्याच्या उद्देशाने गाडीमध्ये शिरत होत्या. जागरूक नागरिक यांनी चोरट्या महिलाना पकडून दिले. यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल करण सोनकांबळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शा़ंता चव्हाण यांनी सदरील महिलांना पकडुन तहसील कार्यालय येथे हजर केले.
सर्व महिला जवळ सर्वसाधारण एक ते दोन वर्षाचे मुलं असून त्यातील केवळ एकाच महिलेकडे मुलं नव्हते त्यामुळे संशय बळावत असून सगळ्यांच महिलांना सारख्याच वयाची मुले कसे काय असाही प्रश्न उद्भवत आहे. प्रवास करत असताना अशा संशयित महिला पासून सावधान राहण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे
भुरट्या महिला चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान.
सध्या बसमध्ये चोरीचे प्रमाण वाढले असून लहान मुलं सोबत घेऊन चोरीच्या उद्देशाने महिला नांदेड महामार्गांवर प्रवास करत आहेत. या संशयित महिलाकडे कुठलाच ओळख पत्राचा पुरावा नसल्याने गुन्हा नोंद तरी कसा करावा असा प्रश्न पोलिसांना पडत आहे. चोरीच्या उद्देशाने वावरात असलेल्या प्रत्येक महिलासोबत लहान मुलं असून त्या बसमध्ये प्रवाशी चढताना अन उतरताना हातसफाई करत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र त्यांचे नाव, गाव, पत्ता नाही तर महिलाना आपल्या कस्टडीत ठेवणे ही पोलिसां समोर अवघड गोस्ट आहे. अशा अनोळखी महिला आपले चुकीचे नाव गाव सांगत आहेत अशावर कार्यवाही कशी करावी असा पोलिसांना प्रश्न पडला आहे. अशा भुरट्या महिला चोरांचा बंदोबस्त करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा