घरकुल अनुदानात वाढ करण्याची लाभार्थीची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटुर परिसरातील गोरगरीब व्यक्ती पोटाची खळगी भरून घराचे बांधकाम करू शकत नाही. अशा व्यक्तींना शासन घरकुल योजनेअंतर्गत घर बांधकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. पण गत काही दिवसांपासून बांधकाम साहित्याची प्रचंड वाढ झाली आहे. या अल्प निधीतून आता घर बांधणे शक्य नाही परिणामी गोरगरिबांच्या स्वप्नावर विरजण पडले आहे . घरकुल अनुदानात वाढ करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .
प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्काचा निवारा असावा असे वाटते . याकरता तो आयुष्यभर कष्ट करतो मात्र अनेक जणांचे उत्पन्न फारच थोडके असते यातून ते घराचे स्वप्न पाहू शकत नाही . अशा नागरिकांना शासन घरकुल बांधकामा करिता निधी उपलब्ध करून देते. प्रत्येक गावात अनेक लोकांनी नावे घरकुल यादीमध्ये समाविष्ट झाली आहे येणाऱ्या काही दिवसात शासनाच्या निधी देखील येईल मात्र महागाई गगनाला भिडली आहे . परिणामी गौरगरिबाचे घराचे स्वप्न आता स्वप्नच राहणार आहे.
त्यातच बांधकाम साहित्य भाव गगनाला भिडले आहेत. पुन्हा भाव वाढण्याची शक्यता दुकानदाराकडून वर्तवली जात आहे . लोखंड प्रति क्विंटल 7400. सात हजार चारशे, विट एक गाडी 30000, तिस हजार. 40000, चाळीस हजार. आसे भाव वाढले आहे . मजुरी देखील मोठ्या प्रमाणात वाढली असून शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात ते होणे शक्य नाही तर येणाऱ्या काळात महागाई अजून वाढली त्यात शंका नाही . असे असताना गरिबाचे घराचे स्वप्न कसे पूर्ण होणार असा प्रश्न लाभार्थ्यांना भेडसावत आहे . शासनाने अनुदानात वाढ करावी अशी गोरी गरीब लाभार्थ्यांची मागणी आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा