खा. राहूल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा निषेध
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
गुजरात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या आधारावर खा. राहूल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. केंद्र सरकारच्या हिटलरशाहीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सोमवारी सकाळी हेडगेवार चौकात रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी मोदी सरकारच्या आणि अदाणीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आहे. त्यातच मोदी सरकारवरही हल्ला करण्याची संध्याकाळी सोडत नाहीत. यादरम्यान गुजरात न्यायालयाने एका प्रकरणात राहूल गांधी यांना दोन वर्षाची सजा सुनावली. या निकालाचा आधार घेवून केंद्र सरकारने राहूल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये तिव्र संतापाची लाट उसळली असून. केंद्र सरकारचा व हिटलरशाहीचा निषेध करण्यासाठी येथील हेडगेवार चौकात काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जेलभरो आंदोलनात नगराध्यक्ष सौ. मिनाताई कल्याण, उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय बेळगे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास चव्हाण, बालाजी मद्देवाड, पंचायत समितीचे माजी सभापती सय्यद रहीम,रवींद्र भालेराव, डॉ. शिवाजी कागडे, शरद भालेराव, संजय चव्हाण, माणिक चव्हाण, सुरेश कल्याण, बाबासाहेब शिंदे, बालाजी शिंदे, पांडुरंग चव्हाण, दत्ता पाटील इज्जतगावकर, गजानन कल्याण यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा