maharashtra day, workers day, shivshahi news,

आर्यारवी एंटरटेनमेंटचा पहिलावहिला राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न

संबळ आणि ढोलकीच्या जुगलबंदीने वाढवली कार्यक्रमाची उंची            

Aryarvi Entertainment, National Short Film Award, parel, mumbai, film award, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, मुंबई-परळ (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर) 

आर्यारवी एंटरटेनमेंटचे निर्माते महेश्वर भिकाजी तेटांंबे यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेचा "पुरस्कार वितरण सोहळा" नुकताच शिरोडकर हायस्कूल शिशुविकास, परेल येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कुटुंब रंगलंय काव्यात फेम प्रा. विसुभाऊ बापट यांनी शिरोडकर शाळेचे संस्थापक कै. डॉ. शिरोडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात पुण्याहून निमंत्रित केलेल्या सौ. लक्ष्मी लांबे-कुडाळकर (प्रसिद्ध ढोलकीपटू) व सौ. गौरी वायचळ-वनारसे (प्रसिद्ध संबळ वादक) यांच्या जुगलबंदीने झाली. प्रमुख संयोजक महेश्वर तेटांबे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आपलं प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले. 

या कार्यक्रमाला कुटुंब रंगलय काव्यात चे श्री. विसुभाऊ बापट, प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक खलीलजी शिरगांवकर, माजी कार्यसम्राट आमदार मधु चव्हाण (भाजप), पराग चव्हाण (उपविभाग प्रमुख शिवडी विधानसभा मतदार संघ), सुप्रसिध्द अभिनेते संजय खापरे, मकरंद पाध्ये, बाळा चौकेकर, चला हवा येवू द्या फेम अंकुर वाढवे, रात्रीस खेळ चाले फेम संजीवनी पाटील, प्राजक्ता वाडये, सिध्दी कामथ, फिल्म क्राफ्ट फेडरेशनचे सरचिटणीस श्री. दिलीपजी दळवी, निर्मिती फिल्म क्लबचे अध्यक्ष अनिल म्हमाने, पत्रकार एन. डी. खान, गुरुनाथ तिरपणकर, राहूल खरात, रघुनाथ ढोक, प्रसाद कडव, दिग्दर्शक सुहास कर्णेकर, संदिप रावजी जाधव, समाजसेवक विजयभाऊ पाटील व इतर नामवंत मंडळीसुध्दा उपस्थित होते. निवेदनाची बाजू लिमका बुक आँफ रेकाँर्ड फेम फणी आणि गाणी चे सुप्रसिध्द कलाकार श्री. शशिकांत खानविलकर यांनी उत्तमरीत्या सांभाळली. 

या पारितोषिक वितरण सोहळ्यात सर्व लघुपट निर्माते, कलाकार व तंत्रज्ञांनी आपली बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती. मान्यवरांचे सत्कार, त्यांची भाषणे व विसुभाऊंच्या खुसखूषित कवितांनी सगळे वातावरण उल्हासित झाले. या सोहळ्यात सर्व प्रथम "उकिरड्याचं घरटं", द्वितीय "बकरु", तृतीय "कडू साखर". स्पेश्यल ज्युरी "बत्ती". शिवाय उत्कृष्ट अभिनय मानसी बांगर (बत्ती), विजय गीते (आरंभ), उत्कृष्ट दिग्दर्शक दिपक पवार (उकिरड्याचं घरटं), उत्कृष्ट कथा/पटकथा दिपक पवार (उकिरड्याचं घरटं), उत्कृष्ट संवाद भरत शिरसाट (बत्ती), उत्कृष्ट छायाचित्रण कपिल अडोले (आरंभ), उत्कृष्ट पार्श्वसंगीत नवीन मोरे (आरंभ), उत्कृष्ट बालकलाकार संस्कार पवार (उकिरड्याचं घरटं), उत्तेजनार्थ लघुपट "ओटू" (सँप प्रोडक्शन) व "कारा" (ऊग्वी कलारंग), जागतिक महिला दिन स्पेशल पारितोषिक विजेत्या ठरल्या सुषमा सिनोलकर (आँक्सिजन फाँर लाईफ) व स्नेहा हरीदास (अयानम, मल्याळी लघुपट), ऊत्कृष्ट प्रेमकथा लघुपट ठरला "फर्स्ट लव्ह", ऊत्कृष्ट भयपट ठरला "ल्युडो क्वीन", ह्रुदयस्पर्शी लघुपट ठरले "मेरी सायकल" व "मिरा", विशेष ऊल्लेखनीय लघुपट ठरला "चावी द की" व ऊत्कृष्ट माहितीपट ठरला "मुंबई माफिया" या शिवाय अभिनयासाठी ऊत्तेजनार्थ पारितोषिक विजेते ठरले श्री. राहुल चवरे(दोन तास), बबन जोशी (कडू साखर), सायली रौंदळ (वारं), संजीवनी जाधव (गजाली), प्रणाली निमजे(कारा), आनंद जाधव (अवलीया), दत्तात्रय तिटकरे (वणवा), कु.आदित्य म्हमाने (मुजरा), प्रशस्ती जाखेडकर(पतंग), श्रध्दा दोंदे(मिरा), त्रिशा पवार (कडू साखर), अमर पारखे - क्रियेटिव दिग्दर्शक (ओटू). 

या राष्ट्रीय लघुपटासाठी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता अनंत सुतार, अभिनेता,निर्माता सुरेश डाळे व ग्राफीक डिझायनर समाजसेवक मनिष व्हटकर यांनी विशेष मेहनत घेतली. शिरोडकर हायस्कुलच्या शिशुविकास मध्ये सादर झालेला दिमाखदार व नेत्रदिपक असा पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी शिरोडकर हायस्कुलच्या १९८८ च्या दुपार अधिवेशनाच्या मित्रपरिवारांचे विशेष योगदान लाभले. अशा तऱ्हेने आर्यारवी एंटरटेनमेंटचा हा पहिलावहिला राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार वितरण सोहळा प्रसिद्ध कलावंतांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला.


----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !