चिमुकल्यांनी सादर केले गीत नृत्य आणि विविध कलांचे सादरीकरण
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
शहरातील लिटल स्टेप इंग्लिश स्कूल नायगाव येथे 2022 ते 2023या शैक्षणिक वर्षाकरिता वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विठुरायाच्या पालखी सोहळ्याने मान्यवरांचे आगमन झाले रंगमंचाचे उद्घाटन स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण ,रवींद्र पाटील चव्हाण संजय आप्पा बेळगे व मान्यवर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी अतिशय दर्जेदार असे नृत्य सादर केले सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या नृत्यामधून करण्यात आला ."गाडीवाला आया कचरा उठाने" या गाण्यातून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देण्यात आला. महाराष्ट्राची संस्कृती जपणारे संत गोरा कुंभाराच्या विठ्ठल भक्ती जिवंत देखावा' विद्यार्थ्यांनी सादर केला विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या आनंदत "माँ ओ मेरी".. मा या गीतामध्ये विद्यार्थ्यासमवेत पालक मातांनी नृत्य सादर केले. 23 मार्च या शहीद दिनाचे औचित्य साधून भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना इंग्रजांच्या जुलमी फाशीविरुद्धची रोमहर्षक अशी नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली.
या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नृत्य नाटिका एकांकिका मध्ये जवळजवळ 340 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे, लिटल स्टेप इंग्लिश स्कूलचे प्राचार्य कुणाला गारटे सर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेचा शैक्षणिक चढता आलेख पालकांसमोर मांडला आणि येणाऱ्या काळात याहीपेक्षा चांगली कामगिरी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याची ग्वाही दिली. संस्थेचे सचिव प्रा.रवींद्र चव्हाण यांनी संस्थेचे सचिव या नात्याने आपल्य भाषणामध्ये येणाऱ्या काळातील शैक्षणिक महत्त्व लक्षात घेता नायगाव सारख्या शहरांमध्ये साठ वर्षापासून शैक्षणिक कार्य करणारी एज्युकेशन सोसायटी ही संस्था इंग्रजी माध्यमाच्या दर्जेदार शाळेचा पर्याय ठरू शकेल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चात दर्जेदार शिक्षण देण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
यावेळी या कार्यक्रमासाठी संजय आप्पा बेळगे (माजी सभापती जि प नांदेड) मीनाताई (नगराध्यक्ष न.प. नायगाव) सतीश सावकार लोकमनवार(संचालक) रवींद्र भालेराव(गरसेविक प्रतिनिधी) शरद भालेराव(मा.अध्यक्ष न.प.) विजय भालेराव(मा.अध्यक्ष न.प.) पांडू पाटील चव्हाण (नगरसेवक),संजय पाटील चव्हाण(नगरसेविका प्रतिनिधी) विठ्ठल आप्पा बेळगे (नगरसेवक)प्रा.डॉ.मारुती माने सर, संतोष पाटील अध्यक्ष किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल) संदीप पाटील रातोळीकर, साईनाथ चनावार (युवक काँग्रेस अध्यक्ष ओबीसीं सेल)माणिक पाटील चव्हाण,नवनाथ पाटील जाधव माता पालक पुरुष मंडळी विद्यार्थी व पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाधव सर, कोलमवर सर,प्रियंका जाधव,रवी सर, ठाकूर सर,डी.बी. पाटील सर, एस.पी.जाधव सर,संतोष पाटील सर,शिवम सर यांनी सहकार्य केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.गारठे सर यांनी मानले.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा