स्वाभिमानी चाय नरसी येथे पत्रकारांशी साधला संवाद
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर)
नायगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, यांच्या विचारधारेवर सर्वसामान्य लोकांना एकत्र करून गेल्या विस वर्षापासून प्रशासनाशी अनेक विषयाच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करून वेळप्रसंगी संघर्ष करणारे बहुजनांचे शेतकरी नेते मा.प्राध्यापक यशपाल भिंगे यांचा बी. आर.एस.पक्षाचे नेते तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीमध्ये बी. आर.एस.पक्षप्रवेश सोहळा झाला. जनसामान्यासाठी लढणारा एक युवा नेता हेरून बी.आर.एस.पक्षाचे नेत्यांनी कैलास येसगे यांना पक्षात घेतल्यामुळे तेलंगणातील बी.आर. एस.पक्ष ग्रामीण भागामध्ये आपल्या पक्षाचे नाळ रुजवण्यास सुरुवात केली.
या निमित्ताने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा लोकसभा यामध्ये पक्षाला बळकटी येईल असे पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेत्यांनी बोलून दाखवला लोहा मतदारसंघाचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे,प्राध्यापक यशपाल भिंगे व कैलास येसगे यांच्यासारख्या तळमळीच्या लोकांनी बी.आर.एस. पक्षात प्रवेश केल्यामुळे निश्चितच पक्षची वाढ होईल असे बी.आर.एस. पक्षाच्या नवनिर्वाचित नेते प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी दैनिक वैराग्यमूर्ती चे तालुका प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर यांच्याशी बोलताना म्हणाले.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा