शेतीच्या कागदपत्रांचीही माहिती एका कटाक्षात कार्यालयाच्या भिंतीवर
शिवशाही वृत्तसेवा परभणी प्रतिनिधी बाळासाहेब घिके
ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालयातील भिंतीवर शेतीशी संबंधित माहिती विविध बोधकथांच्या माध्यमातून अगदी सहज, सोप्या आणि समजेल अशा भाषेत दर्शनी भागात लावण्यात आली आहे. त्यामुळे परभणी तहसील कार्यालय अत्यंत बोलके झाले असून तहसीलदार गणेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते या भिंतीपत्रकाचे विमोचन करण्यात आले आहे.
अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार गणेश चव्हाण, नायब तहसीलदार लक्ष्मीकांत खळीकर यावेळी उपस्थित होते.
तहसील कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिक व ग्रामस्थांकडून या फलकावरील कथा आणि त्यावरील शिकवण यांचे वाचन होऊन त्यांचे प्रबोधन होण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून जमिनीच्या व्यवहारातून होणारे तंटे कमी होऊन त्याचा प्रशासनावर पडणारा ताण व तंटे सोडवण्यासाठी होणारा वेळेचा अपव्यय थांबून सामाजिक एकोपा निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा