शिवसेना तालुका संघटक शंकर पिटलेवाड यांच्या वतिने भव्य क्रिकेटचे खुले सामने संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
मुखेड तालुक्यातील मंग्याळ येथे मुखेड तालुका शिवसेना प्रमुख नागनाथ लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना तालुका संघटक शंकर पिटलेवाड आणि ग्रामीण फेमस जय मल्हार सेना XI यांच्या वतीने क्रिकेटचे भव्य खुले सामने मंग्याळ ता.मुखेड येथे आयोजित करण्यात आले होते.
शिवसेना तालुका संघटक शंकर पिटलेवाड आणि ग्रामीण फेमस जय मल्हार सेना XI यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले क्रिकेट चे भव्य खुले सामने आयोजित करण्यात आलेल्या, सामन्याचे पारितोषिक,प्रथम पारितोषक,द्वितीय पारितोषक,तृतीय पारितोषक विजेत्या संघास दि. 25 मार्च 2023 रोजी पारितोषक वितरण करण्यात आले.
यावेळी शिवसेने चे जिल्हा समन्वयक मा. दशरथ लोहबंदे यांच्या वतीने प्रथम पारितोषक २११२१/- रुपये,द्वितीय पारितोषक क्रष्णा सावकार गबाळे यांच्याकडुन १११११/- तृतीय पारीतोषक मा.माधव हुग्गेवाड यांच्याकडुन ७७७७/- रु पारितोषिक वितरण मंग्याळ ता.मुखेड येथे करण्यात आले. यावेळी शिवसेने चे जिल्हासम्वयक दशरथराव लोहबंदे , शिवसेना मुखेड तालुकाप्रमुख नागनाथ लोखंडे, मुखेड तालुका संघटक शंकर पिटलेवाड,शहरप्रमुख शंकर चिंतमवाड,उपतालुकाप्रमुख शाम पा.शिंदे, जांब सर्कल विभागप्रमुख संजय पाटील लादगेकर,युवासेनेचे उमेश सिध्देश्वरे,ज्ञानेश्वर पा.देवकत्ते, संदीप पिलेवाड,संतोष घाळेवाड,विश्वनाथ लोखंडे,योगेश मरकंठवाड,सैलानी शेख,माधव हुगेवाड, मंग्याळ येथिल ग्रामस्थ व तालुक्यातील व परिसरातील क्रिकेट प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा