तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची रविवारी लोहा येथे जाहीर सभा
शिवशाही वृत्तसेवा, परभणी (प्रतिनिधी बाळासाहेब घिके)
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे संस्थापक चंद्रशेखर राव यांची रविवारी (दि.26) महाराष्ट्रातील दुसरी सभा नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील सर्व निवडणुका पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची माहिती भारत राष्ट्र समिती किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी दिली.
भारत राष्ट्र समितीच्या विस्तारासाठी होणार्या सभेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी तथा निजामाबाद येथील बाजार समितीचे सभापती सुधाकर पोला, शेतकरी संघटनेचे नेते रंगनाथ चोपडे, अमृत शिंदे, बाळासाहेब आळणे, जाफर तरोडेकर आदी उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा