राहुल गांधींविरोधात भाजपा महानगरतर्फे निदर्शने
शिवशाही वृत्तसेवा, परभणी (प्रतिनिधी बाळासाहेब घिके)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ’’मोदी ’’ या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजबांधवांचा अपमान केल्याबद्दल न्यायालयान दोषी ठरवत त्यांना शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत असा आरोप करीत भाजपा परभणी महानगरतर्फे याविरोधात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. खा. राहुल गांधीं यांच्या छायाचित्राला जोडे मारुन भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधी तुफान घोषणाबाजी केली
या प्रसंगी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, संघटन सरचिटणीस एन.डी.देशमुख, सरचिटणीस संजय रिझवाणी, दिनेश नरवाडकर, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, विजय गायकवाड, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, मंडळ अध्यक्ष भीमराव वायवळ, सुहास डहाळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रामदास पवार, ग्रामीण युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, चिटणीस संतोष जाधव, रोहित जगदाळे, वैभव शिंदे, दिलीप काळदाते, रावसाहेब धरणे, वैजनाथ दहिफळे ,गजानन काळे, खडके, संदीप शिंदे, दीपक शिंदे, निरज बुचाले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा