स्व्.वसंतदादा काळे यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
सहकार शिरोमणी वसंतरावदादा काळे यांच्या पुण्यतिथी निमित्त् व जयंतीनिमित्त प्रतीवर्षी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.कल्याणराव काळे यांचे मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, 21 व्या पुण्यतिथी निमित्त् 2 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी पर्यत किर्तन सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे यांचेहस्ते श्रीविठ्ठल रुक्मिणीस अभिषेक व कलश पुजन करुन, स्व.वसंतदादा काळे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन करण्यात आले. वारकरी सांप्रदायाच्या परंपरेप्रमाणे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, जगदगुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कारखान्याचे संचालक भारत कोळेकर व समस्त उपरी भजनी मंडळ यांच्या शुभहस्ते दिपप्रज्व्लन करण्यात आले.
स्व.वसंतदादा काळे यांच्या 21 व्या पुण्यतिथी निमित्त गुरुवार दि.02 फेब्रुवारी ते 08 फेब्रुवारी या कालावधीत दररोज सायंकाळी 8.00 ते 10.00 यावेळेत नामांकित महाराजांच्या किर्तनांचे आयोजन करण्यात आले असून, आज प्रसिध्द् किर्तनकार ह.भ.प. भागवत महाराज बागल, गादेगांव यांचे सायं.8.00 वा. किर्तन सोहळ्याने प्रारंभ होणार असून, दि.03 रोजी ह.भ.प.तुकाराम महाराज मस्के-भोसे, दि.04 रोजी ह.भ.प. दादा महाराज कापासे- सांगवी, दि.05 रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कौलगे-पिराची कुरोली, दि.06 रोजी ह.भ.प.तात्या महाराज चौंगुले-भाळवणी दि.07 रोजी ह.भ.प.धनंजय महाराज गुरव- धोंडेवाडी, दि.08 रोजी ह.भ.प.मच्छिंद्र महाराज कावडे-पळशी यांचे किर्तन होणार आहे.
गुरुवार दि.09 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वा. झी टॉकिज फेम भागवताचार्य ह.भ.प. रुपालीताई सवणे, परतूरकर यांचे काल्याचे किर्तन होणार असून, सदर दिवशी वसंत केसरी कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच सहकार शिरोमणी कारखाना व वसंतदादा काळे मेडिकल फौंडेशन संचलित मल्टीस्पेशालिटी चॅरीटेबल जनकल्याण हॉस्पीटल पंढरपूर यांचे संयुक्त् विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबीर घेण्यात येत असून 05 फेब्रुवारी रोजी भाळवणी येथील वसंतराव काळे विद्यामंदिर येथे घेण्यात येणार आहे. या शिबीरामध्ये नामांकित तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी मार्गदर्शन करण्यात येत असून, मोती बिुदूचे ऑपरेशन येण्या-जाण्याच्या सोयीसह मोफत करण्यात येणार आहे. तसेच 09 फेब्रुवारी रोजी कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व गरजुंनी सर्वरोग निदान शिबीरास, सर्व भाविक भक्तांनी किर्तन सोहळ्यास व कुस्ती प्रेमींनी जंगी कुस्ती मैदानास मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा. यावेळी या सोहळ्याचे व्यवस्थापक ह.भ.प.धनंजय गुरव, नारायण शिंदे, भजनी मंडळ उपरी, कार्यकारी संचालक झुंजार आसबे, डेप्यु.जनरल मॅनेजर के.आर.कदम, डिस्टीलरी मॅनेजर पी.डी.घोगरे, टेक्नि.जनरल मॅनेजर पी.टी.तुपे, प्रोडक्श्न मॅनेजर पी.आर.पाटील, को-जन मॅनेजर एस.बी.डुबल, चिफ अकौंटंट बबन सोनवले, सिव्हिल इंजिनिअर नानासाहेब काळे, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर कुंभार इ.अधिकारी, कर्मचारी व परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा