बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली एकूण प्रकरणाची माहिती
शिवशाही वृत्तसेवा, मोहोळ
पाटकुल येथे फुटलेल्या डावा कालव्याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख चरण राज चवरे यांनी निवेदन देऊन सविस्तर माहिती दिली. तसेच यासंबंधी चर्चा करून शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले फोटो दाखवून झालेले नुकसान भरपाई च्या बाबतीत लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देऊ असे आश्वासन दिले व त्या संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून आव्हान सादर करण्याचे सूचनाही दिल्या
बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे वर्षा निवासस्थानी भेट घेऊन पाटकुल येथे फुटलेल्या डावा कालवा याच्या संदर्भात निवेदन देऊन सविस्तर चर्चा करून पूर्णपणे माहिती दिली व हा कालवा फुटल्यामुळे मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचे काही फोटोही चवरे यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले हे सर्व पाहून एकंदरीत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "त्या शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करू नये असे आश्वासन देऊन त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे लवकरात लवकर सादर करावे अशा सूचना केल्या आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सर्व सामान्य कुटुंबातील असल्यामुळे त्यांना गरिबीचे जाण आहे त्यामुळे कष्टकरी शेतकऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचे चिंता करू नये हे सरकार आपलं आहे कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे त्यामुळे कुठल्याही संकटाला घाबरू नये असा विश्वास आम्हाला वाटतो तसेच सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत सर व महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोलापूर जिल्ह्यात काम करतो सावंत परिवाराला ही गरिबीची जाण आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील संपर्कप्रमुख शिवाजी सावंत सर हे पण रात्रंदिवस सर्वसामान्याच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या पद्धतीने बाळासाहेबांची शिवसेना काम करत असल्याचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी शिवशाही न्यूज शी बोलताना सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा