श्री संत दामाजी साखर कारखान्यावर संस्थापक व्हा. चेअरमन स्व.रतनचंद शहा शेठजी यांची जयंती साजरी
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा ( राज सारवडे)
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व्हा.चेअरमन स्व.रतनचंद शहाशेठजी यांची १०३ वी जयंती कारखाना कार्यस्थळावर साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी संस्थापक व्हा.चेअरमन स्व.रतनचंद शहाशेठजी व संस्थापक चेअरमन स्व.कि.रा.मर्दा उर्फ मारवाडी वकिलसाहेब यांचे कारखाना साईटवरील पूर्णाकृती पुतळ्यास कारखान्याचे चेअरमन मा.श्री शिवानंद यशवंत पाटील, व्हाईस चेअरमन मा.श्री.तानाजी लक्ष्मण खरात, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन मा.श्री राहूल शहा यांनी संचालक मंडळासह पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
सदर प्रसंगी चेअरमन शिवानंद पाटील म्हणाले कि, "स्व.रतनचंद शहा शेठजी यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी मंगळवेढा शहर व तालुक्यातील सामाजीक, राजकीय, सहकार, शिक्षण, आर्थिक क्षेत्रात तालुक्याच्या विकासाकरिता मोठया प्रमाणात योगदान दिलेले आहे. शेठजीनी ३५ वर्षेर् मंगळवेढयाचे नगराध्यक्ष म्हणुन चांगल्या पध्द्तीने काम पाहिले आहे. कारखान्याचे पाच वर्षे व्हाईस चेअरमन व पाच वर्षे संचालक होते. तसेच मंगळवेढा अर्बन बँकेची स्थापना करुन शहर व तालुक्याच्या विकासासाठी आर्थिक स्त्रोत निर्माण करुन विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. शहरात दामाजी महाविद्यालय व दामाजी हायस्कुलची स्थापना करुन शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिलेने हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचे विचार व कार्य स्मरणात ठेवून कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री तानाजी खरात व संचालक मंडळ, कामगार वर्ग यांच्या माध्यमातुन सभासदांच्या हितासाठी काम करुन ऊसाला जास्तीत जास्त दर देवून ऊस उत्पादक सभासद, शेतकरी व कामागार यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करीत आहोत".
सदर जयंतीचे कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक सर्वश्री औदुंबर वाडदेकर, राजेंद्र चरणू पाटील, दयानंद सोनगे, बसवराज पाटील, महादेव लुगडे, तानाजी काकडे, दादासो दोलतडे यांचेसह चंद्रशेखर कोंडूभैरी, मुझप‹फर काझी, लक्ष्मण नागणे, बठाणचे माजी सरपंच पिंटु शिंदे, मुढवीचे बागायतदार साईनाथ ठेंगील, उद्योजक शत्रुघ्न वाकडे तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री सुनिल दळवी, चिप इंजिनिअर धैर्यशील जाधव, चिफ केमिस्ट रमेश जायभाय,चिफ अकौंटंट रमेश गणेशकर, शेती अधिकारी कृष्णात ठवरे, कार्यालयीन अधीक्षक दगडू फटे, स्टोअरकिपर उत्तम भुसे, लेबर आùफिसर आप्पासो शिनगारे, शेती विभागाचे पंडित गायकवाड, पर्चेस ऑफिसर येताळा सावंजी, ई.डी.पी. मॅनेजर मनोज चेळेकर, केनयार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील, सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे, कामगार संघटना व पतसंस्थेचे पदाधिकारी, विभागप्रमुख, कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा