मद्यधुंद कंटेनर चालकाचा हलगर्जीपणा नडला, अपघातात बसचा चक्काचूर
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
मुखेड तालुक्यातील शिरूर पाटीजवळ कंटेनर, बस व मोटारसायकलचा विचित्र अपघात झाला. या अपघातात आठ जण जखमी झाल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली असून यात कंटेनर चालक दारुच्या नशेत असल्याने घटना घडली असल्याची माहिती प्रथमदर्शी नागरिकांनी दिली.
मुखेड आगाराची बस क्रमांक एम.एच.२० बीएल २२२८ ही बस सावरगाव येथून मुखेडकडे येत असताना शिरुर दबडे येथील पाटीजवळ कंटेनर क्रमांक जिजे ०५ बीएक्स ७६४२ हा कंटेनर चालक दारूच्या नशेत वेगाने मुखेडकडून येत असताना बसला जोराची धडक दिली व कंटेनरच्या पाठीमागून येणारी मोटारसायकल कंटेनरला धडक दिली. हा अपघात ऐवढा भिषण होता की, बसचा समोरील बाजूचा पत्रा चकनाचुर झाला असून सुदैवाने बसमध्ये जास्त प्रवासी नसल्याने जीवित हाणी टळली.
दरम्यान या अपघातात सग्राम मुंडे (४५), पुष्पाबाई बनसोडे (५१), प्रल्हाद इमडे, रघुनाथ मस्कले, देविदास राठोड (६५), रामदास कबिर, मिरा पांढरे (३६) व बालाजी हाक्के हे जखमी झाले असून यातील बस चालक रामदास कबिर यांनी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर डॉ. एस. एस. ताहडे, सिस्टर शोभा काशेवाड, कालींदा ढोबळे, ब्रदर योगेश दीना पावरा, शंकर तेलंग, संदीप पवार, लक्ष्मी मावशी, मेस्कोचेगार्ड लखन पवार, प्रशांत बनसोडे, टी.जी. गोजेगावे, अमोल खिल्लारी यांनी उपचार केला.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा