मंगळवेढा पोलीस ठाणेची कामगिरी
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (राज सारवडे)
दिनांक ०१/०२/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री. रणजित माने सो, यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मौजे चडचण (कर्नाटक राज्य) येथून एक महिंद्रा बोलेरो पीकअप मधून काही इसम हे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा अवैधरित्या घेवून येणार असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्याने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील साो, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक रणजीत माने सो, पोहेकॉ महेश कोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोना सुनिल मोरे, पोकॉ मळसिध्द कोळी, पोकॉ अजित मिसाळ, पोकॉ खंडाप्पा हात्ताळे, अशी टिम तात्काळ मौजे मरवडे ता.मंगळवेढा गावाकडे खाजगी वाहनाने रवाना झाले.
मरवडे गावाच्या अलीकडे हॉटेल सहयाद्रीच्या समोर कच्च्या रस्त्याजवळ रात्री ८:३० च्या सुमारास समोरून एक महिंद्रा पीकअप वाहन आले पोलिसांनी पीकअप ( क्र. एम. एच ०८ डब्ल्यु ४३९९) थांबविले पीकअप मध्ये दोन व्यक्ती होते त्यांचे नांव, गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नांव संभाजी अमसिध्दराव बन्ने (वय ३९ वर्षे रा. कमलापूर ता. सांगोला जि. सोलापूर,) व बिकेन्नी गणपती नाव्ही (वय ३२ वर्षे जालिहाळ बु॥ ता. जत जि.सांगली) अशी सांगितले. पोलिसांनी पीकअपच्या हौदयात काय आहे असे विचारले असता ते उडवा उडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांनी त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी पीकअपच्या हौदयात गुटखा असल्याचे सांगितले. हा गुटखा माल व पिकअप वाहन कोणाचे मालकीचे आहे याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुटखा हा अमित विभुते (रा. मंगेवाडी ता. सांगोला जि. सोलापूर) व पिकअप वाहन तानाजी माळी (रा. एकतपूर रोड सांगोला ता. सांगोला जि. सोलापूर) यांचे असल्याचे सांगितले. आणखी चौकशी केल्यानंतर त्यांनी हा गुटखा मल्लु चांदकोटी (रा. चडचण ता. चडचण जि. विजापूर राज्य कर्नाटक) याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना महिन्द्रा पिकअपसह पिकअप मधील मुदेमाल पोलीस स्टेशनला घेवून येवून दोन पंचासमक्ष पिशव्या तपासून पाहता त्यात रु १,२४,८००/- किंमतीचा विमल पान मासालाचे १०४० पाकीट प्रत्येकी किंमत १२० रूपये, रु. ३१,२००/- किमतीचे व्ही - १ तंबाखुचे १०४० पाकीट प्रत्येकी किंमत ३० रूपये, रु.३,७३, १२०/- किंमतीचा हिरा पान मसाला २१२० पाकीट प्रत्येकी किंमत १७६ रूपये, रु. ९३,२८० /- किमतीची रॉयल ७१७ तंबाखुचे २१२० पाकीट प्रत्येकी किंमत ४४ रुपये, रु. १,५५,५८४/- किमतीचा केसर युक्त विमल पान मसालाचे ८३२ पाकीट प्रत्येकी किंमत १८७ रूपय, २७,४५६ / - किमतीची व्हि-१ टोबॉको तंबाखुचे ८३२ पाकीट प्रत्येकी किंमत ३३ रूपये रु.३,७४, २२०/-किमतीचा विमल पान मसालाचे १८९० पाकीट प्रत्येकी किंमत १९८ रुपये, रु. ४१,५८० /- किमतीची व्ही-१ टोबॅको तंबाखुचे १८९० पाकीट प्रत्येकी किंमत २२ रूपये, रु. २,१८,४००/- किमतीचा आर.एम.डी पान मसालाचे २८० पाकीट प्रत्येकी किंमत ७८० रुपये, व रु. १,००८००/-किमतीची एम सेंटेंट तंबाखुचे २८० पाकीट प्रत्येकी किंमत ३६० रुपये, रु. ८,००,०००/- किमतीची महिन्द्रा बोलेरो कंपनीचे चारचाकी पिकअप ( नंबर एम. एच ०८ डब्ल्यु ४३९९ ) असा एकूण २३,४०,४४०/- किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
त्यानंतर पोलीस ठाणेस आणून मा. सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर यांना सदर वाहनातील गुटखा जन्यपदार्थ व इसम यावर योग्य ती कायदेशीर कारवाईक करणेबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यांनतर मा. सहा. आयुक्त औषध प्रशासन विभाग सोलापूर यांच्या पथकाने मंगळवेढा पोलीस ठाणेस येवून सदरचा मुददेमाल व इसम यांना त्याचे ताब्यात दिले. सहा. आयुक्त औषध प्रशासन विभाग सोलापूर यांनी जप्त मुददेमालाचा पंचनामा करून, या प्रकरणी संभाजी अमसिध्दराव बन्ने, बिन्नी गणपती नाव्ही, अमित विभुते व पिकअप वाहन मालक / वाहन आणून देणारा, तानाजी माळी, गुटखा पुरवठादार, मल्लु चांदकोटी, यांच्यावर मंगळवेढा पोलीस ठाणेस भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २७२, २७३ व ३२८ सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२) (i) व २६ (2) (ii), २६ (२)(iv), सहवाचन कलम २७ (३) (E), कलम ३० (२) (1) शिक्षापात्र कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, गुन्हयाचा तपास पोहेकॉ महेश कोळी हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी व त्याचे पथकातील पोहेकॉ महेश कोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोना सुनिल मोरे, पोकॉ मळसिध्द कोळी, पोकॉ अजित मिसाळ, पोकॉ खंडाप्पा हात्ताळे, यांच्या पथकाने केली.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा