मा.आ. वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नामांकित कंपनीच्या साड्याचे म्हणजेच आमची स्वतःची कापड मिल असलेले शोरूम आता आपल्या नायगाव शहरांमध्ये उपलब्ध होणार असून या श्री योगेश्वरी होलसेल टेक्सटाईल मार्केट कपड्याची भव्य दालन चा भव्य शुभारंभ माजी आमदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र पाटील चव्हाण यांची उपस्थिती होती.
दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोज शुक्रवार दुपारी आयोजित केलेल्या या श्री योगेश्वरी होलसेल टेक्स्टाईल मार्केट कपड्याचे भव्यदलांचा भव्य शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यामध्ये खास करून लग्न बस्त्यासाठी होलसेल मिल रेटमध्ये विक्री आणि नारी लगे प्यारी, जय पहनी हो योगेश्वरी, कनेक्शनची साडी आणि आवड तुमची वस्त्रे आमची, या स्लोगनखाली सर्वसामान्य लोकांना अतिशय कमी शुल्क मध्ये परवडणारे शूटिंग सेटिंग, हजारो रेडीमेड, हॅन्डलूम बेडशीट, टावेल, सुरत साडी, नऊवारी, बेंगलोर सिल्क, बनारस शालू, मालेगाव नऊवार, येवला पैठणी, शेरवानी, ब्लेजर शूट, गाऊन, लेगिंग, पेटिकोट अशा विविध कपड्याचे भव्य दालन आजसुरु करण्यात आले.
श्री योगेश्वरी होलसेल टेक्स्टाईल मार्केट कपड्याच्या भव्य दालनाचा शुभारंभ माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या हस्ते झाला असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र पाटील चव्हाण , माधवराव बेळगे, केशवराव पाटील चव्हाण, शिवराज पाटील होटाळकर, श्रीराम सावकार मेडेवार, हनुमंतराव पाटील चव्हाण, पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, संजय बेळगे, राजेश कुंटूरकर, नगराध्यक्ष मीनाताई सुरेश पाटील कल्याण, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, तहसीलदार गजानन शिंदे यांची उपस्थिती होती. शुभारंभ प्रसंगी बहुसंख्येने ग्राहक व नागरिक उपस्थित होते. त्यांचे सुरेश बाबूलाल येवले व जगनाथ श्रीधर सूर्यवंशी यांनी आभार मानले आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा