गुलाब पुष्पहार ,शाल ,श्रीफळ देऊन पुरी यांचा सन्मान
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर )
कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांचा पस्तीसावा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे युवा उद्योजक कैलास बोडले ,संपादक मोहनराव तुरटवाड ,पत्रकार माधव धडेकर यांनी आयोजन करून सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांचा समाधान रिसॉर्ट येथे दिनांक २९ जानेवारी रोजी ११ : १५ वाजता वाढदिवस मोठ्या थाटात गुलाब पुष्पहार ,शाल ,श्रीफळ देऊन साजरा करण्यात आला.
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्यात अतिशय उत्कृष्टपणे कर्तव्य बजावणारे खाकी वर्दीतील मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या ४५ गावाचा कारभार एक पोलीस अधिकारी म्हणून उत्कृष्टपणे जबाबदारी सांभाळत आहेत या ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्वच गावात शांतता अबाधित ठेवून सार्वजनिक उत्सव असो की धार्मिक या कार्यक्रमाकडे अतिशय कटाक्षपणे लक्ष देत असतात अशा कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा वाढदिवस दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी कृष्णूर येथील समाधान रिसॉर्ट येथे सपोनि महादेव पुरी यांचा ३५ वा वाढदिव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
अभिष्टचिंतन सोहळ्याचे अध्यक्ष पत्रकार माधव धडेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे , पत्रकार पवनकुमार पुठेवाड , रावसाहेब पाटील बेलकर ,प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार प्रल्हाद भंडारे ,रौफ शेठ कल्यापुरे ,व्यावसायिक माधव कागडे ,बबलू कागडे ,सम्राट सिरसे सोमठाणकर ,मंजित सिरसे सोमठाणकर , सोनाक्षी माधव धडेकर आदींनी शुभेच्या दिल्या.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा