दहावीचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी शिक्षक, शिक्षिकेच्या भूमिकेत
नांदेड प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
तालुक्यातील कुंटूर येथील शांतिनिकेतन माध्यमिक विद्यालयात येथे शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.सुजाता गाडगे हीने मुख्याध्यापिका व सूर्यकांत देवदे प्रवेक्षक म्हणून काम पाहिले. तर लीपीक म्हणुन कु.क्रांती शिंगणे आणि लो.प्रा.शाळेच्या मु.अ म्हणुन अश्विनी गायकवाड हिने काम पाहीले. इ. दहावीचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी शिक्षक, शिक्षिका म्हणुन भुमिका पार पाडले. तर परीक्षक म्हणून शिंदे, श्री भुसेवार सर, श्री पाटील एस.व्ही, सौ.नव्हारे मॅडम यांनी काम केले.
सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती या कार्यक्रमाचे नियोजन वर्ग शिक्षक वडजे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीश्री वडजे पा.डी, भुसेवार एम.टी, पांडे एन.एस, पाटील एस.व्ही, शिंदे जी.एस, महादळे एम.एन, सौ.नव्हारे पी.पी, मुख्याध्यापक अधिकारी मनोहर पाटील यांनी सहभागी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक वडजे यांचे अभिनंदन केले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा