मात्र नाकेबंदि करून सोनखेड पोलीसांनी कंटेनर सह चोर पकडला
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
गडगा येथे पोलीस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी कंटेनर आडवला त्यानंतर चालकास बेदम मारहाण करून त्याचे हातपाय बांधून विना नंबरच्या कारमधून अपहरण करून शिकारा ता.मुखेड शिवारातील एका ऊसाच्या फडात टाकून दिले.आणि कंटेनर पळवून नेत असताना पोलीसांनी घटनेची माहिती समजताच लावलेल्या नाकाबंदीत कंटेनरसह एका चोरट्यास शिताफीने पकडले.ही घटना नरसी-मुखेड राज्यमार्गावर रातोळी गावालगत मन्याड नदीच्या पुलावर ३० जानेवारीच्या रात्री पावनेबाराच्या सुमारास घडली.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
संतोष विरभद्र बोडके (वय ४५ वर्षे रा.पोखर्णी ता.बिलोली) हे त्यांचा कंटेनर क्रमांक डी.एन.०९ यू- ९१५३ हा तेलंगणा राज्यातील बिचकुंदा येथून भूसा भरून गुजरातकडे जात असताना ३० जानेवारी रोजी रात्री पावनेबाराच्या सुमारास नरसी-मुखेड राज्यमार्गावर रातोळी गावालगत मन्याड नदीच्या काठावर पाठीमागून वेगाने आलेल्या विना नंबरच्या कार मधून चार-पाच तसेच अन्य दुसऱ्या वाहनाने तीन जण असे एकूण आठ जणांनी आम्ही पोलीस आहोत तुझ्या गाडीत गुटखा आहे म्हणत काही जण कंटेनरच्या कॅबीनमध्ये प्रवेश केला.काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी कंटेनर चालक बोडके यांना बेदम मारहाण करून हात पाय बांधून तोंडात कापडी बोळा कोंबला. चोरट्यापैकी एकाने कंटनेर ताब्यात घेऊन पळवला. बाकीच्या चोरट्यांनी त्यांना कारच्या डीकीत टाकून त्यांचे अपहरण करीत चालक बेशुद्ध झाल्याचे दिसून आल्याने त्यास शिकारा ता.मुखेड परीसरातील ऊसाच्या फडात टाकले व ते पसार झाले.
काही वेळाने कंटेनर चालक बोडके यांनी अतिशय प्रसंगावधान राखून हातापायाला बांधलेले सुडके कसेबसे सोडून घेतले.त्यानंतर ते शिकारा येथील गावकऱ्यांना घडलेली घटना कथन केली.तेथील पोलीस पाटील व गावकऱ्यांनी पोलीस मदत वाहीनीच्या ११२ क्रमांकावर घटनेची माहिती दिली.पोलीसांनी सर्वत्र नाकाबंदी केली. विशेषतःमुखेड, लोहा,सोनखेड, नायगाव,उस्माननगर पोलीसांना अलर्ट करण्यात आले.अन् सोनखेड पोलीसांच्या जाळ्यात आरोपी चोरट्यास कंटनेरसह मोठ्या शिताफीने पकडले.या घटनेत कंटेनर नायगाव पोलीसांनी ताब्यात घेतला असून आरोपी चोरट्याची कसून चौकशी पोलीस करीत आहेत.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा