संत रोहिदास देवस्थानचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी केले गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांचे स्वागत
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा (विष्णू मुंगसे)
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत रोहिदास महाराज मंदिरास गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली. संत रोहिदास देवस्थानचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांचे स्वागत केले.
यावेळी हभप सुखदेव महाराज मुंगसे, बाळू महाराज कानडे, कुंडलिकदादा कदम, पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी पाटील चेडे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ पाटील मुंगसे, हभप तुकाराम महाराज केसभट, माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, प्रगतशिल शेतकरी चंद्रभान कदम, माजी चेअरमन राजाराम मुंगसे, बाबासाहेब तांबे, बाबासाहेब मुंगसे, पोपट बनसोडे, लक्ष्मण पंडित, पत्रकार विष्णू मुंगसे, तलाठी बालाजी मलदोडे, सोपान तांबे, उत्तम तांबे, संभाजी काजळे, बजरंग दलाचे सागर मुंगसे, गणेश औटी, शिवाजी काजळे, संदीप नांगरे, किशोर मुंगसे, बबन तांबे, राजाराम मुंगसे, राजू मुंगसे, सतीश मुथ्था, कैलासनाथ मित्रमंडळाचे राजेंद्र कदम, अरुण वांढेकर, हरिभाऊ मुंगसे, मधुकर क्षिरसागर, आकाश चेडे, जनार्दन तांबे, पांडुरंग रक्ताटे, नवनाथ मुंगसे, भागचंद मुंगसे, भाऊसाहेब मुंगसे, बालाजी देडगाव ग्रामस्थ व भजनी मंडळ उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा