नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
संत सेवालाल महाराज सतराव्या शतकामध्ये गोरगरीब जनतेला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याचबरोबर बंजारा समाजाच्या एकोपा आपल्याला पाहायला मिळतो. जाण जो छान जो पचज मानजो, या वाक्यातून त्यांची चिकित्सक वृत्ती दिसून येते इंग्रजा विरुद्ध उठावा, अन्याय अत्याचार विरुद्ध लढा ,कोई खेती नानो मोठो छेई या वाक्यातून सामाजिक एकोपा आपल्याला पाहायला मिळतो , खरं माणूस अनुभवातूनच घडत असतो असे सर्व समाज घटकांना एकत्र आणण्याचे काम सद्गुरु सेवालाल महाराजांनी केले आहे.
सेवालाल महाराजांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासन घेतली व सर्व शासकीय कार्यालयात जयंती सेवालाल महाराजांची पंधरा फेब्रुवारी जयंती साजरी करण्याचे त्यांनी आदेशानुसार त्यांच्या कार्याची माहिती सर्वसामान्य जनतेला जयंतीच्या निमित्ताने व्हावी यासाठी सर्व शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी कुंटुर तांडा येथे बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. सर्व बंजारा समाजाच्या वतीने पारंपारिक वेशभूषा, परिधान करून महिला व पुरुषाने संत सेवालाल महाराजांची जयंती 15 फेब्रुवारी रोजी कुंटुर तांडा येथे साजरी करण्यात आली.
यावेळी येथील महिला बचत गटांच्या समुह संसाधन व्यक्ती रेखाताई अनिल कांबळे कुंटुरकर व गटांच्या अध्यक्ष सचिव सर्व महिला सदस्य उपस्थित होते. यावेळी, नायक भोपाजी पवार, कारभारी पांडुरंग पवार, बळवंत पवार, नंदाताई बालाजी पवार, अनिल पवार, विलास राठोड, डॉ विलास पवार, अंकुश पवार, सुमन पवार, गुलाब पवार, कचरू पवार, सचिन जाधव, आदी ने अन्न दान केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा