विक्रम पाटील बामणीकर
शिवशाही वृत्तसेवा,नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
जुन्या नांदेड शहरातील चौफळा येथे असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असून येत्या १९ फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा असून गेल्या दोन वर्षापासून करोणा महामारीमुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा दोन वर्षापासून जन्मोत्सव साजरा करण्यात आलेला नाही त्यामुळे यावर्षी १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा शिवभक्ताच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे.
त्यानिमित्त विविध कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित केलेले असतात त्यामुळे महापालिकेच्या वतीने तात्काळ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह परिसरात रंगरंगोटी करण्यात यावी व परिसरात एलईडी लाईट तात्काळ बसवण्यात यावे त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा येणाऱ्या काळात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात शिवभक्ताच्या वतीने साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीत व जुन्या नांदेड शहरात श्री छत्रपती शिवरायांचा पुतळा असून त्या परिसरात तात्काळ परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी रंगरंगोटी व एलईडी बल्प तात्काळ बसविण्यात यावे अशा मागणीचे निवेदन बाळासाहेबांची शिवसेना उपशहर प्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी महापालिकेचे आयुक्त साहेब त्यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा