नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
विश्वकर्मीय समाजाचे आद्य संत भोजलिंग काका यांचा अवमान करणाऱ्या वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काका यांच्यावर कारवाई करा अशी मागणी जिल्हा विश्वकर्मीय समाजाने केली या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी ढगे साहेब यांना देण्यात आले. विश्वकर्मीय समाजाचे संत भोजलिंग काका हे परभणीचे सुपुत्र आहे त्यांचे चरित्र लोकांना समजावे याकरिता दिनांक 12 ते 14 फेब्रुवारी रोजी परभणीत होणाऱ्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनात त्यांचा गौरवइा व्हावा अशी भावना वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काका यांच्याकडे सुदर्शन बोराडे यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान पाटील यांनी सुदर्शन बोराडे यांना अर्वाच्य शिव्या गाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व समाजाविषयी अर्वाच्य भाषेत संत भोजलिंग काका यांच्या विषयी अवमान कारक भाषा वापरल्या निवेदनात म्हटले आहे पाटील यांचे वर्तन सुसंस्कृती व समाजाला धरून नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी समाजाचे अध्यक्ष अनंत पांचाळ, सुदाम ,पांचाळ सुनील पांचाळ, भरत पांचाळ, भागवत पांचाळ, जगन्नाथ लोहारे, विष्णू बप्पा पांचाळ, हरी पांचाळ, आदी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा