उपचार दवाखान्यात औषधं बाहेरून घेण्याची रुग्णांवर आली वेळ
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण 45 गावे येतात पाच उपकेंद्र आहेत सदर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मध्ये औषधीचा तुटवडा गेल्या आठवड्यापासून होत असल्याची नागरिकांची ओरड सुरू असून संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले खोकल्याचे औषध ,बीपी चे गोळ्या ,सुगर गोळ्या, अशा काही वस्तूंचा तुटवडा गेल्या दोन महिन्याभरापासून असून आम्ही वरिष्ठ अधिकारी नांदेड येथे आरोग्य विभागाकडे अशी माहिती कळवली आहे .
औषधी पुरवठा आला नाही आल्यानंतर संबंधित रुग्णांना वाटप करण्यात येईल व त्यांना तपासून ते औषधी गोळ्या देण्यात येईल अशी माहिती केंद्रातील औषधी विभागाचे कर्मचारी यांनी सांगितले त्यामुळे कुंटुर येथे गोरगरीब जनता दोन रुपयाची चिठ्ठी काढून आपल्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी व शासकीय आरोग्य विभागाचे मध्ये उपचारासाठी येत असतात त्यांना मात्र बाहेरून औषध घ्यायची वेळ आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लवकर औषधी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिक व उपचार घेत असलेल्या रुग्णांनी केली आहे.
वातावरणात बदल झाल्यामुळे ग्रामीण भागात सर्दी खोकला ,प्रमाणात जास्त वाढ होत आहे. त्यामुळे महागाचे औषध घेण्याची ऐपत नसणाऱ्या गरीब कुटुंबांना शासकीय रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये जाऊन उपचार घेताना मात्र औषधी पुरवठा नसल्याचे सांगल्यामुळे बाहेरून महागाचे औषध खरेदी करण्याची वेळ आली. सधर उपचार घेत असलेल्या नागरिकांनी सांगितले त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळेच लक्ष देऊन कुंटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व संबंधित पाच उपकेंद्रांमध्ये सर्व औषधी पुरवठा करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी व उपचार घेत असलेल्या रुग्णांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा