सहाय्यक प्रशासन अधिकारी आमोद टोणपे यांच्या हस्ते रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाज कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील पंचायत समिती येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभि यायान कक्षात माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार व पूजन सहाय्यक प्रशासन अधिकारी आमोद टोणपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस. व्हि.बासरकर, मलेश येडके तालुका अभियान व्यवस्थापक, बाबु चंद्रकांत डोळे, एम एस आर एल एम. गंगाधर मोरे, समुह संसाधन व्यक्ती रेखाताई कांबळे कुंटुरकर, ज्योती पोतलवार कोलंबी, वंदना कागडे कृषणुर, विमल जेठी मुगाव, सेवक शेख मोईनसाब, उपस्थित होते. रेखाताई कांबळे कुंटुरकर यांचा वतीने पंचायत समिती नायगाव कार्यालयात माता रमाबाई आंबेडकर यांची फोटो देण्यात आले. पेढे वाटून आनंदात माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा