मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त होणार दवाखान्याचे उदघाटन
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त "बाळासाहेब-आपला दवाखाना" चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या शुभहस्ते व आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत उद्या गुरुवारी मुंबई येथे दि.9 फेब्रुवारी रोजी होणार आहे.त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी दिल्या असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
सर्व सुविधांनी सज्ज असणाऱ्या दवाखान्याचे उदघाटन मुंबई येथे होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा सोलापूर जिल्हा आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणीही होणार आहे. तरी बाळासाहेबांची शिवसेनाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शक्य असणाऱ्या जिल्हा आरोग्य केंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उपस्थित रहावे अशा सूचना व आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत केले आहे.यावेळी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, पै बाळासाहेब चवरे,दिलीप चवरे ,सागर चवरे आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दवाखाना म्हणजे गोरगरिबांसाठी नवसंजीवनीराज्याचे कर्तव्यतत्पर व लाडके आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी गोरगरिबांसाठी या दवाखान्याची सोय होणार आहे.मोलमजुरी करणारे व आर्थिकदृष्ट्या हालाकीची परिस्थिती असणाऱ्यांसाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे.जनतेच्या हिताच्या दृष्टीने दवाखाना नवसंजीवनी ठरणार आहे.- चरणराज चवरे,जिल्हाप्रमुख , बाळासाहेबांची शिवसेना
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा