विद्यार्थी शिक्षक बनुन मुलाकडुन अभ्यास करून घेतले
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
कुंटुर येथील जिल्हा परिषद हायस्कूल कुंटुर येथे स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. एक दिवस विद्यार्थी शिक्षक बनुन मुलाकडुन अभ्यास करून घेतले. शिक्षकांची जबाबदारी काय असते याचा अनुभव घेतला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. गिताताई बकवाड होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक पवन देवघरे, उप मुख्याध्यापक अरुण अनिल कांबळे, प्रवेशिका कु.वैशाली चाकोरे,कुं.अनुजा शिंदे, समीर कलयापुरे, अनिकेत कमळे, कुणाल कदम, विवेक कदम, संघर्षा हनमंते, कु संगीता कौठकर यांनी केले तर आभार बी.एम.बावणे सरांनी मानले.
परिक्षणाचे कार्य एक एम कचकलवाड, व्हि.एंन.चवहाण, सौ.आर.एन. दुर्गम, दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी केला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा