राहेल बनले आहे अवैध धंद्याचे माहेर
नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या मौजे राहेर हे तालुक्यातील शेवटचे गाव व जिल्हा परिषद कुंटूर सर्कलच्या टोकाचे गाव म्हणून ओळखले जाते नदीकाठच्या गावामध्ये रेती वीट भट्ट्या चा मोठा सुळसुळाट दिसून येतो अवैध धंद्याचे माहेर घर म्हणून राहेर ची ओळख आहे. राहेर मध्ये अवैधविट भट्ट सुरू असून वीट भट्ट त्यासाठी लागणाऱ्या परवानगीकडे दुर्लक्ष केलेले असून दिवस रात्र मातीची उत्खनन करून विट भट्या शेतामध्ये बसवले आहेत
यामध्ये राहेर हुस्सा ,बळेगाव ,इज्जतगाव ,परिसरातील काही शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन उपयुक्त जमीन शेतीसाठी न वापरता वीट भट्ट्याच्या कामासाठी दिली असून शेती हे वीटभत्यासाठी वापरत असून लाखोंचा व्यवहाराची उलाढाल केली जात आहे. नदीकाठ पसरट होत असून अवैध प्रमाणे मातीचे उत्खनन करून वीटभट्ट्या थाटले आहेत. विट भट्या यासाठी लागणारे प्रदूषण महामंडळाचे परवानगी सुद्धा घेतली नसल्याचे काही वीट भट्टी धारकाकडे आढळून आले आहे . सर्व वीटभट्टी हे रस्त्यावर लागत असून काही गावाला चिटकून सुद्धा आहेत. गावात प्रदूषण होत आहे यामुळे अनेक लोकांना प्रदूषणामुळे वीटभट्टीतून निघणाऱ्या धुरामुळे संबंधित गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. व अन्य आजार जडत आहेत . धक्कादायक बाप समोर आली असली तरीही वीटभट्टी धारकाकडे कोणत्याही प्रकारचे शासकीय परवानगी नसल्याची बाब समोर आली आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रदूषण महामंडळाचे परवानगी घेतली नाही. तहसील मधून फक्त माती वाहतुकीची परवानगी घेऊन अनेक विट भट्या थाटले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा