कंगणा राणावतचा नेपोकिड्स वर पुन्हा एकदा जोरदार हल्ला
बॉलीवूड वर आगपाखड करणारी अभिनेत्री कंगना रानौत हिने पुन्हा एकदा नेपोकिवर हल्लाबोल केला आहे. कंगनाने एक भली मोठी इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनाने एक ' नेपोकिड ' व त्यांच्या पत्नीवर अनेक आरोप केले आहेत. कंगनाने आपल्या पोस्टमध्ये या नेपोकिडचं नाव दिलेले नाही . पण तिचा इशारा रणवीर कपूर व आलिया भट कडे असल्याचं म्हणलं जात आहे.
कंगनाचे आरोप
कंगना लिहिते, मी जिथे जाते तिथे माझा पाठलाग केला जातो आणि हे रे गिरी केली जाते फक्त रस्त्यावरच नाही, तर माझ्या इमारतीच्या पार्किंग मध्ये आणि घराच्या टेरेसवरही माझा पिच्छा केला जातो. मला कॅप्चर करण्यासाठी ते झूम लेन्स लावतात. प्रत्येकाला माहित आहे की, टीप मिळाली असेल, तरच पापाराझी स्टार्सला कॅप्चर करायला पोहोचतात. आता त्यांनी माझे फोटो क्लिक करायला सुरुवात केलीय. यासाठी माझी टीम किंवा मी त्यांना पैसे देत नाही. मग त्यांना कोण पैसे देत आहे ? सकाळी मला साडेसहा वाजता क्लिक केलं गेलं. त्यांना माझं शेडूल कसं कळतं ? ते या फोटोचं काय करतात ? आज मी पहाटे कोरिओग्राफी सेशन केलं. मी तिथे येणार आहे, हे कोणालाही ठाऊक नव्हतं, पण तरीही रविवार असूनही पापाराझीनी मोठ्या संख्येने गर्दी केली. माझा व्हाट्सअप डेटा, माझ्या पर्सनल गोष्टी, माझ्या प्रोफेशनल डील्सही लीक केल्या जात आहेत.
मला एकट पाडण्याचा कट
त्याने त्याच्या बायकोला निर्माती होण्यासाठी भाग पाडलं, इतकच नाही तर त्याच्या बायकोने स्त्रीप्रधान करावेत, माझ्यासारखे कपडे घालावेत, यासाठी ही बायकोला भाग पाडलं, अगदी माझ्यासारखं घराचं इंटरियर ही त्याने बनवलं.
माझ्या स्टायलिस्टला आणि होम स्टायलिस्ट नाही स्वतःकडे नियुक्त केलं. त्याची बायको त्याच्या या वेडेपणाला प्रोत्साहन देत आहे. मी माझ्या भावाच्या रिसेप्शनमध्ये नेसली अगदी तशी साडी तीने तिच्या लग्नात नेसली.
हे भीतीदायक आहे
अलीकडेच माझ्यासोबत दशकभरापासून असलेला माझा एक कॉस्च्युम डिझायनर मित्र माझ्याशी भांडला. योगायोग म्हणजे, माझं काम सोडून तो त्याच्याकडे कामाला गेला. माझे फायनान्सर किंवा बिजनेस पार्टनर शेवटच्या क्षणी दिल रद्द करतात.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा