तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांची पत्रकार परिषदेत घोषणा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंतुरकर
बाभळी बंधार्याबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधल्यास बाभळी बंधाऱ्याचा मुद्दा मी समोपचाराने काही मिनिटात संपवून टाकतो. एवढेच नव्हे तर माझ्या राज्यातील श्रीराम सागर बाबत संधी करून त्यातील पाणी मी महाराष्ट्राला द्यायला तयार आहे अशी ही माहिती तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिली. आज बी आर एस पक्षाच्या भारतीय मान्यतेनंतर नांदेडमध्ये पहिली सभा झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बी आर एस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर पत्रकारांशी संवाद साधत होते.
नांदेड जिल्ह्यातील बाबळी बंधाऱ्याचा मुद्दा समोर आला तेव्हा मी स्वतः व माझ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडे अनेक फेऱ्या मारल्या पण त्यातून फलित काहीच झाले नाही. इतरही अनेक प्रकल्प महाराष्ट्र आणि तेलंगणाशी जोडलेले आहेत. त्याबद्दल नेहमी आम्ही महाराष्ट्रातील नेत्यांची संपर्कात असतो. बाभळीचा प्रश्न मी काही मिनिटात सोडू शकतो पण महाराष्ट्राच्या नेत्यांनी माझ्याकडे यायला हवे. मी बाभळीची नव्हे तर आता देशाच्या पाणी प्रश्नावर बोलत आहे. तेव्हा मी बाभळी सारख्या एक टीएमसी पाणी थांबविणाऱ्या विषयावर जास्त वेळ लावणार नाही बाभळी बंधाऱ्यातून सुरू असलेले नाटक महाराष्ट्र तेलंगाना आंध्रप्रदेश या तिन्ही राज्यांच्या जनतेसोबत सुरू असलेला खेळ आहे. गोदावरी नदीपात्रातून २४००० टीएमसी पाणी वाहून समुद्राला मिळते अशा परिस्थितीत महाराष्ट्र तेलंगाना आंध्र प्रदेश या राज्याच्या नेतृत्वांनी हा प्रश्न एकत्रितपणे बसून सोडवला पाहिजे आणि मी त्यासाठी सदैव तयार आहे उपलब्ध आहे. बाबळी बंधाऱ्याच्या प्रश्नसंदर्भात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी त्यांना खूप वेळेस भेटलो पण त्यातून काहीच निष्कर्ष निघाला नाही माझ्या राज्यात असलेल्या श्रीराम सागर धरणाबाबत संधी केली तर मी त्यातील पाणी महाराष्ट्रातील बीड जालना उस्मानाबाद लातूर जिल्ह्यांना देण्यासाठी तयार आहे.
दुसऱ्या प्रश्नावर बोलताना आदानी हा मोदी मुळेच मोठा झाला. त्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी लावली जात नाही. भारतीय जीवन विमा निगमचे खाजगीकरण झाले तरी बी आर एस पक्ष सतेत आला तर त्याचे शासकियकरण करेल. विदेशातून एक किलो सुद्धा कोळसा आयात करायची गरज नसताना लाखो टन कोळसा मागवला जात आहे.तो अदानी मागवतो. अदानी हा मोदीजींचा मित्र आहे. म्हणून तसे होत आहे. ज्या ठिकाणी नुकसान होते तेथे सरकार जनतेवर खापर फोडते आणि ज्यामध्ये फायदा होतो त्याचे सरकार खाजगीकरण करते असे चालणार नाही.
त्यासाठी बी आर एस पक्ष सदैव जनतेच्या फायद्याचा विचार करेल. भारतीय नेत्यांना ज्ञान कुठून प्राप्त होते ते घ्यायला हवे. याच गतीने देश चालणार असेल तर देशाची प्रगती अशक्य आहे. बी आर एस पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना के सी आर म्हणाले त्यासाठी शंभर सव्वाशे लोक काम करत आहेत ती पद्धती पूर्ण तयार झाल्यानंतर मी पत्रकारांच्या वतीने ती देशातील जनतेसमोर मांडणार आहे. देशात छोटे छोटे राज्य किंवा लोकसंख्या निहाय राज्य बनविण्यासाठी बी आर एस पक्षाचा पाठिंबा आहे. पण त्यासाठी उच्चस्तरावरून कार्य नियोजन होणे गरजेचे आहे. भारतात सौर ऊर्जा ही पण एक मोठी शक्ती आहे. भारतात कोठे शीतलता, कुठे जास्त उष्णता आणि कुठे दमट वातावरण आहे या भागात तयार होणारी वेगवेगळी खाद्यपदार्थ तयार करणारे संस्कृती आहे या खाद्यपदार्थाची एक चैन साखळी तयार करून त्यातून एक उत्कृष्ट फूड प्रोसेसिंग उद्योग उभारला जाऊ शकतो पण भारताचे दुर्दैव यांनी आज मॅच डोनाल्ड खातो त्यावर सुद्धा बी आर एस पक्ष काम करणार आहे.
दिल्लीच्या विमानतळावर उतरण्यासाठी ४५ मिनिटे हवेत फेऱ्या माराव्या लागतात अशा परिस्थितीत वेळेचा व इंधनाचा अतिरिक्त खर्च होतो. या संदर्भाने त्यांनी रेल्वे वाहतुकीचा वेगदर तासाला २४ किलोमीटर आहे हाच वेग चीनमध्ये १२० किलोमीटर आहे. तसेच भारतात ट्रक द्वारे मालवाहतुकीची गती ५० किलोमीटर प्रति तास आहे हीच गती जपानमध्ये ८० किलोमीटर प्रति तास आहे आणि युकेमध्ये ९५ किलोमीटर प्रति तास आहे मग आम्ही त्याच्याबरोबर ला केव्हा जाणार.
देशातील प्रत्येक शेतीला पाणी दिले तरीही चाळीस हजार टीएमसी पाणी लागेल त्यानंतर सुद्धा साठवणूक योग्य रीतीने झाली तर पाण्याच्या मिसिमध्ये मोठे बदल होतील. जे भारतासाठी अत्यंत गरजेचे आहेत. कारण आजच्या परिस्थितीत भारतात कुठे दुष्काळ तर कुठे महापूर अशी परिस्थिती असते. मी सांगितलेले सर्व आकडे केंद्र सरकारच्या विविध विभागाने जाहीर केलेले आहेत. केसीआर ने तयार केलेली नाहीत. पाण्याच्या प्रश्नात शेतकऱ्याची आत्महत्या जोडून केसीआर यांनी नाना पाटेकरचा उल्लेख केला. का त्यांना जनतेची मदत करावी लागते? सरकार सक्षम नाही काय? बी आर एस पक्ष सत्तेत आला तर दोन वर्षात भारत विजेच्या झगमगटांनी झळाळून निघेल. बी आर एस सतेत आला तर ३३ टक्के महिलांचे आरक्षण पूर्ण करू देशाला आर्थिक प्रगती करायची असेल तर देशाच्या आर्थिक नीतीला बदलण्याची गरज आहे असे केसीआर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा