स्थापनेपासून 25 वर्षात या पतसंस्थेची पहिल्यांदाच झाली आहे निवडणूक
शिवशाही वृत्तसेवा, सांगोला
सांगोला तालुका मेडशिंगी येथील संभाजीराव उर्फ दादासाहेब शेंडे ग्रा. बि. शेती सहकारी पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी अरुणभाऊ शेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर व्हाईस चेअरमन पदी शंकर लवटे यांची निवड करण्यात आली. स्थापनेपासून पंचविस वर्ष बिनविरोध असणारी पतसंस्थेची पहिल्यांदाच निवडणूक हॊऊन सत्ताधारी पॅनल बहुमतानी विजयी झाले. व अरूणभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनल दे.भ.संभाजीराव उर्फ दादासाहेब शेंडे संस्था बचाव पॅनल मेडशिंगी आकरा पैकी दहा उमेदवार विजयी झाले. नूतन संचालक पदी तुकाराम शिंदे, प्रवीण इंगवले पाटील, तानाजी लिगाडे, प्रभाकर कांबळे ,आबासाहेब इंगवले, शकुंतला इंगवले, सुदर्शन इंगवले ,धनाजी शिंदे,सदिच्छा शिंदे यांची निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शेख व घोडके यांनी काम पाहिले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा